Header Ads

Dr. Prashant Narnaware Posted as Women and Child Welfare Commissioner : महिला व बालकल्याण आयुक्तपदी डॉ. प्रशांत नारनवरे रूजू

Dr. Prashant Narnaware Posted as Women and Child Welfare Commissioner : महिला व बालकल्याण आयुक्तपदी डॉ. प्रशांत नारनवरे रूजू


महिला व बालकल्याण आयुक्तपदी डॉ. प्रशांत नारनवरे रूजू

Dr. Prashant Narnaware Posted as Women and Child Welfare Commissioner

मुंबई, दि. 10 (www.jantaparishad.com) : महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे डॉ. प्रशांत नारनवरे (Dr. Prashant Narnaware Posted as Women and Child Welfare Commissioner) यांनी आज स्वीकारली. यावेळी बालविकासचे उपायुक्त राहुल मोरे, प्रशासन विभागाच्या उपायुक्त वर्षा पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. नारनवरे यांचे स्वागत केले. श्री. नारनवरे हे प्रशासन सेवेतील 2009 तुकडीचे अधिकारी आहेत.

डॉ. नारनवरे यांनी सांगली येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Dr. Prashant Narnaware former ZP CEO Sangli) , उस्मानाबाद व पालघरचे जिल्हाधिकारी (former Collector Usmanabad / Collector Palghar) आणि सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको यासारखी पदे भूषवली आहेत.

जनतेप्रती प्रशासनात संवेदनशीलता निर्माण करणे, उत्तरदायित्वाची भावना निर्माण करून प्रशासन अधिक जलद करणे हे उद्द‍िष्ट्ये ठेवून डॉ. नारनवरे यांची कार्यप्रणाली राहिलेली आहे.

यावेळी सहायक आयुक्त योगेश जवादे, उपसंचालक सुचिता साकोरे, सहायक आयुक्त मनीषा बिरारीस, सहायक आयुक्त ममता शिंदे, परीविक्षा अधीक्षक दत्तात्रय मुंडे, रचना व कार्यपद्धती अधिकारी गोविंद इसानकर, सांख्यिकी अधिकारी प्रमोद निकाळजे, झुंबर जाधव, अश्विनी कांबळे उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.