Header Ads

Svata La svata Viruddha ubh karatanna by Vishakha Vishwanath awarde by Yuva Sahitya Akadami Award - ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ कविता संग्रहाला युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

Svata La svata Viruddha ubh karatanna by Vishakha Vishwanath awarde by Yuva Sahitya Akadami Award - ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ कविता संग्रहाला युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर


‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ कविता संग्रहाला युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

साहित्य अकादमीचे युवा आणि बाल साहित्य पुरस्कार जाहीर

        नवी दिल्ली, 26 : साहित्य क्षेत्रात मानाचे समजले जाणाऱ्या साहित्य अकादमीच्या ‘युवा’ आणि ‘बाल’ पुरस्कारांची घोषणा दिनांक २३ जून रोजी करण्यात आली. मराठी भाषेसाठी  विशाखा विश्वनाथ (Vishakha Vishwanath) या युवा साहित्य‍िकेच्या ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ (Svata La svata Viruddha ubh karatanna) या कविता संग्रहास युवा साहित्य अकादमी पुरस्कार (Yuva Sahitya Award) जाहीर झाला आहे.  

        साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक  (Sahitya Akadami President Madhav Kaushik) यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या बैठकीत साहित्य अकादमीच्या युवा आणि बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. प्रत्येक भाषेतील पुरस्कारांसाठी 3 सदस्यीय निर्णायक मंडळाच्या निर्धारित निवड प्रक्रियेचे पालन करत उत्कृष्ट साहित्य लेखनाची निवड पुरस्कारांसाठी  करण्यात आली आहे. दोन्ही श्रेणीतील पुस्तके मागील पाच वर्षांमध्ये 1 जानेवारी 2017 पासून ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत प्रकाशित झालेली आहेत.

        युवा साहित्य पुरस्कारांमध्ये 20 भाषेतील युवा साहित्यिकांना अकादमीचा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. तर, बाल साहित्य पुरस्कारांसाठी  22 भाषेतील साहित्यकांची अकादमीच्या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. युवा आणि बाल साहित्य पुरस्कारांचे स्वरूप मानचिन्ह आणि 50 हजार रूपये रोख असे आहे.

Vishakha Vishwanath - विशाखा विश्वनाथ


        मराठी भाषेसाठी नवोदित तरूण कवयित्री विशाखा विश्वनाथ यांच्या ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ या कविता संग्रहास साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. विशाखा यांचा हा पहिलाच कविता संग्रह आहे. 86 कविता असणाऱ्या त्यांचा हा संग्रह प्रकाशक गमभन यांनी प्रकाशित केलेला आहे. यामध्ये कवयित्रीने स्वत: सोबत भांडण करत स्वत: वर प्रेम करण्यापर्यंतचा प्रवास शब्दबद्ध केला आहे. पुरस्कार जाहीर झाले असल्याचे कळल्यावर, ‘परीकथा खरी झाली असल्यासारखे जाणवत असल्याची प्रतिक्रिया दिली.’ कुटुंबात कोणाचाच वावर साहित्य क्षेत्रात नसल्याचे सांगून आपल्याला जे आवडते ते लिहिण्याचा हा प्रयत्न असल्याचे विशाखा यांनी सांगि‍तले. विशाखा यांचे शिक्षण फिल्म मेकिंग (Film Making) मध्ये झालेले असून फिल्म मार्केटिंग (Film Marketing) मध्ये त्या काम करतात. गोष्ट एका पैठणीची, अथांग, गुडबाय, पावनखिंड, झोंबिवली, चंद्रमुखी, शेर शिवराज, मी वसंतराव या सारख्या 50  नामांकित हिंदी मराठी चित्रपट आणि वेबसिरीजसाठी डिजिटल मार्केटिंग आणि कॉपीरायटिंग त्यांनी केलेलं आहे.

        मराठी भाषेतील निवड साहित्य मंडळामध्ये  ख्यातनाम साहित्य‍िक डॉ. अक्षय कुमार काळे, बाबा भांड आणि प्रा. डॉ.विलास पाटील यांचा समावेश होता.       

No comments

Powered by Blogger.