Header Ads

Chhand Dei Anand : Bal Sahitya Akadami Puraskar : ‘छंद देई आनंद’ या कविता संग्रहास बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

Chhand Dei Anand : Bal Sahitya Akadami Puraskar : ‘छंद देई आनंद’ या कविता संग्रहास बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर


‘छंद देई आनंद’ या कविता संग्रहास बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

Chhand Dei Anand - Bal Sahitya Akadami Puraskar

साहित्य अकादमीचे युवा आणि बाल साहित्य पुरस्कार जाहीर

        नवी दिल्ली, 23 : साहित्य क्षेत्रात मानाचे समजले जाणाऱ्या साहित्य अकादमीच्या ‘युवा’ आणि ‘बाल’ पुरस्कारांची घोषणा दिनांक २३ जून रोजी करण्यात आली. मराठी भाषेसाठी  बाल  साहित्यासाठी  बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्या  ‘छंद देई आनंद’  या कविता संग्रहास बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. (Chhand Dei Anand by Eknath Awad awarded Bal Sahitya Akadami Puraskar)

        साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक (Sahitya Akadami President Madhav Kaushik) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत साहित्य अकादमीच्या युवा आणि बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. प्रत्येक भाषेतील पुरस्कारांसाठी 3 सदस्यीय निर्णायक मंडळाच्या निर्धारित निवड प्रक्रियेचे पालन करत उत्कृष्ट साहित्य लेखनाची निवड पुरस्कारांसाठी  करण्यात आली आहे. दोन्ही श्रेणीतील पुस्तके मागील पाच वर्षांमध्ये 1 जानेवारी 2017 पासून ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत प्रकाशित झालेली आहेत.

        युवा साहित्य पुरस्कारांमध्ये 20 भाषेतील युवा साहित्यिकांना अकादमीचा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. तर, बाल साहित्य पुरस्कारांसाठी  22 भाषेतील साहित्यकांची अकादमीच्या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. युवा आणि बाल साहित्य पुरस्कारांचे स्वरूप मानचिन्ह आणि 50 हजार रूपये रोख असे आहे.

        मराठी भाषेतील निवड साहित्य मंडळामध्ये  ख्यातनाम साहित्य‍िक डॉ. अक्षय कुमार काळे, बाबा भांड आणि प्रा. डॉ.विलास पाटील यांचा समावेश होता.



        सुप्रसिद्ध बाल साहित्यकार व कथाकथनकार एकनाथ आव्हाड (Ekanath Awad) यांच्या ‘छंद देई आनंद’  (Chhand Dei Anand) या मराठी बाल कविता संग्रहास साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार (Bal Sahitya Akadami Puraskar) जाहीर झाला. लेखक मागील 30 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देतांना श्री आव्हाड म्हणाले, ‘मागील 30 वर्षांपासून बालकांसाठी लिहित असलेल्या साहित्याचे या पुरस्कारामुळे चीज झाले.’

        साहित्य‍िक श्री. आव्हाड हे मुलांसाठी कथा, कविता, नाट्यछटा, चरित्र, काव्यकोडी असे विविध प्रकारचे लेखन करतात. त्यांचे अक्षरांची फुले, आभाळाचा फळा, खरंच सांगतो दोस्तांनो, गंमतगाणी, तळ्यातला खेळ, पंख पाखरांचे, बोधाई, मज्जाच मज्जा, हसरे घर, सवंगडी, मजेदार गाणी, आनंद झुला, शब्दांची नवलाई असे बाल कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. मराठी भाषेसाठी तीन सदस्यीय निर्णायक मंडळामध्ये कैलाश अभुंरे, उमा कुलकर्णी आणि शफ़ाअत खान या साहित्य‍िकांचा समावेश होता.

No comments

Powered by Blogger.