Header Ads

वाशिम पोलीस कवायत मैदान येथे महाराष्ट्र दिनाचा ६३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा - Washim Police Training Ground : Maharashtra Din Program

वाशिम पोलीस कवायत मैदान येथे महाराष्ट्र दिनाचा ६३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा - Washim Police Training Ground : Maharashtra Din


वाशिम पोलीस कवायत मैदान येथे महाराष्ट्र दिनाचा ६३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते ध्वजारोहण

        वाशिम दि.०१ मे (जिमाका) महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम वाशिम येथील पोलीस कवायत मैदान (Washim Police Training Ground) येथे उत्साहात संपन्न झाला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत (Washim ZP CEO Vasumana Pant) यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह (Washim SP Bachchan Singh) ,सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नु पी.एम, .अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अभिनव बालुरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.विजय काळबांडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.



            ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत झाले. श्रीमती पंत यांनी परेडचे निरीक्षण केले.वाशिम पोलीस दलाचे पुरुष व महिला पथक,गृहरक्षक दलाचे पुरुष व महिला पथक,पोलीस बँण्ड पथक दल आदी परेडमध्ये सहभागी झाले होते. परेडमध्ये सहभागी पथकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.परेडचे नेतृत्व परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक श्रीमती किर्थीका यांनी केले.श्रीमती पंत यांनी यावेळी कार्यक्रमाला उपस्थित विविध क्षेत्रातील नागरीकांची सदिच्छा भेट घेतली.

           श्रीमती पंत यांच्या हस्ते वीर पत्नी शांताबाई यशवंत सरकटे, पार्वतीबाई दगडू लहाने,वैशाली अमोल गोरे यांचा साळी चोळी देऊन सन्मानीत करण्यात आले. उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्यंकट मिठ्ठेवाड,सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार तसेच विविध कार्यालयाचे कार्यालय प्रमुख व कर्मचारी तसेच नागरिकांची उपस्थिती होती.



         यावेळी शासकीय सेवेत निवड झालेल्या उमेदवारांना श्रीमती पंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यामध्ये भूमि अभिलेख विभागात भुकरमापक तथा लिपीक पदावर निवड झालेले योगिराज खडसे,विजय बिजवे,पंकज ढोके,गोपाल राठोड, आकाश जाधव,अनुराग महल्ले, विक्रीकर विभागात राज्य कर निरीक्षक वर्ग-२ या पदावर निवड झालेले वैभव नप्ते,समाधान भगत, दिपक खंडारे,शुभम राऊत,आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ञ वर्ग १ या पदावर निवड झालेले डॉ.राजसिंग पवार,निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) पदावर निवड झालेले डॉ.संदीप हेडाऊ,वैद्यकीय अधिक्षक पदावर निवड झालेले डॉ.प्रविण वानखेडे,जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी पदावर निवड झालेले डॉ.मिलींद जाधव,नेत्र शल्यचिकित्सक पदावर निवड झालेले डॉ.आशिष बेदरकर,राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक पदावर भारतकुमार धुरट,मयुर भोंडे, प्रतिभा कुंभाट यांचा समावेश आहे.

          कार्यक्रमाचे संचालन शिक्षक मोहन शिरसाठ यांनी केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर,पत्रकार बांधव, कर्मचारी,नागरिक व विविध शाळेचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.