Header Ads

आमदार लखन मलीक यांची मागणी : सा.बां. विभागाचे अकार्यक्षम कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा : Appeal by Washim MLA Lakhan Malik : PWD Washim EE & DE inefficient, file criminal cases against them

आमदार लखन मलीक यांची मागणी : Appeal by Washim MLA Lakhan Malik : PWD Washim EE & DE inefficient, file criminal cases against them

सा.बां. विभागाचे अकार्यक्षम कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा

File criminal cases against inefficient EE & DE of PWD Washim

आमदार लखन मलीक यांची मागणी : जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

Demand of Washim MLA Shri Lakhan Malik: Complaint to Collector

        वाशिम (www.jantaparishad.com) दि 01 - येथील विश्रामगृहासाठी  आदेशित असलेले पेव्हर ब्लॉकचे काम विश्राम भवनात करुन चुकीचे व निकृष्ट काम करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिठ्ठेवाड व उपअभियंता राजेंद्र घिनमीने यांनी केलेल्या चुकीचा कामाची चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणीसाठी आमदार लखन मलीक (Washim MLA Lakhan Malik) यांच्या वतीने २८ एप्रिल रोजी जिल्हाधिकार्‍यांना तक्रार देण्यात आली आहे.

          या तक्रारीत नमूद केले आहे की, जिल्हा नियोजन अंतर्गत १० फेब्रुवारी २०२२ रोजी पारित आदेशानुसार स्थानिक बसस्थानक नजीकच्या विश्रामगृहात पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामास मंजूरी देण्यात आली होती. सदर विश्रामगृह अनेक वर्षापासून बंद स्थितीत आहे. या ठिकाणी रस्ता नादुरुस्त असल्याचा अहवाल आ. मलीक यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करून याठिकाणी कुठल्याही कामाची आवश्यकता नसताना देखील सा.बा. विभागाचे कार्यकारी अभियंता मिठ्ठेवाड व उपअभियंता घिनमीने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची दिशाभूल करून सदर ठिकाणी रस्त्याच्या कामाची प्रशासकीय मान्यता घेतली आहे.

        प्रशासकीय मान्यता विश्रामगृहात पेव्हर ब्लॉक बसविणे अशी आहे. परंतु सदर काम प्रशासकीय मान्यतेनुसार न करता विश्राम भवन येथे संबंधित अधिकार्‍याने काम सुरू केले आहे. याबाबत उपअभियंता यांना विचारणा केली असता सदर कामाची मान्यता ही विश्रामगृहातील आहे परंतु कार्यकारी अभियंता यांनी निर्देशित केल्याप्रमाणे विश्राम भवन येथे काम सुरू करण्यात आले असल्याची लेखी माहिती उपअभियंता यांनी दिली आहे. तसेच सुरु असलेल्या सदर रस्त्यावरील डांबरी थर क्षतीग्रस्त आहे व दोन ठिकाणी खड्डे पडले आहेत. सदर काम ३०.१०% कमी दराने भरले आहे. त्यामुळे काम देखील निकृष्ठ दर्जाचे होणार आहे. तसेच सदर कामाची मान्यता ही १०/२/२०२२ रोजी दिली आहे. यानंतर एक वर्ष कामाचा कार्यरंभ आदेश न दिल्यामुळे या कामाचा निधी शासनाकडे समर्पित करण्यासाठी देखील नियोजन विभागाकडून कार्यकारी अभियंता मिठ्ठेवाड यांना सूचित करण्यात आले होते. तरी देखील निधी सपर्मित केला नाही व एक वर्षाच्या कालावधीनंतर १३ मार्च २०२३ रोजी कामाचा कार्यरंभ आदेश दिला आहे. त्यामुळे या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनिमियता व भ्रष्टाचार असल्याचे लक्षात येते. 

        त्यामुळे या संपूर्ण कामाची तात्काळ चौकशी करून कार्यकारी अभियंता मिठ्ठेवाड व उपअभियंता घिनमीने यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून (File criminal cases against inefficient EE & DE of PWD Washim) त्यांचे तात्काळ निलंबन करावे त्यांच्यावर विभागीय चौकशी लावण्याबाबत शासनाकडे तात्काळ प्रस्ताव सादर करावा अशी मागणी आ. लखन मलीक यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रार पत्राव्दारे केली आहे.

No comments

Powered by Blogger.