Header Ads

जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण - Maharashtra Day : Flag hoisting : Washim Collector Office



जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण

        वाशिम,दि.०१मे (जिमाका)  www.jantaparishad.com - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त आज १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत झाले. यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. 



        निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पुजारी,जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार,सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार तसेच विविध कार्यालयाचे कार्यालय प्रमुख व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

        कार्यक्रमाचे संचालन मोहन शिरसाठ यांनी केले.

No comments

Powered by Blogger.