pradhan mantri matru vandana yojana (PMMVY) information in Marathi - प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY)
कुटुंबातील पहिल्या जीवित अपत्यासाठी गर्भवती माता व स्तनदा मातांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY)) या योजनेचा लाभ अनुज्ञेय असून, या योजनेअंतर्गत गर्भवती माता व स्तनदा मातांना काही निकष पूर्ण केल्यानंतर रू. ५००० ची रक्कम ३ टप्प्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जातो. मात्र वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. राज्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये सेवा दिली जाते.
योजनेचा लाभ मिळण्यासाठी माता आणि बाल सुरक्षा कार्ड, लाभार्थी आणि तिच्या पतीच्या आधार कार्डची झेरॉक्स, लाभार्थीच्या स्वतंत्र बँक पासबुकची झेरॉक्स आणि नवजात बालकाचे जन्मनोंदणी प्रमाणपत्र ही विहित कागदपत्रे जोडावयाची असून, फॉर्म नोंदणी आणि कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर लाभार्थीची माहिती केंद्र शासनाच्या पोर्टलवर भरल्यानंतर किमान ३० दिवसांच्या आत लाभार्थीच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाते.
Post a Comment