Janani Shishu Suraksha Karyakram (JSSK) Yojana in Marathi - जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम
Janani Shishu Suraksha Karyakram (JSSK)
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (Janani Shishu Suraksha Karyakram (JSSK)) या योजनेअंतर्गत गरोदर मातेस व प्रसूती पश्चात ४२ दिवसांपर्यंत मोफत सुविधा देण्यात येतात. प्रसूति, सिझेरियन शस्त्रक्रिया, प्रसूति संदर्भातील, गरोदरपणातील व प्रसूति पश्चात आवश्यक औषधे व साहित्य, प्रयोगशाळेतील तपासण्या, प्रसूति पश्चात आहार (स्वाभाविक प्रसूती ३ दिवस, सिझेरीयन प्रसूती ७ दिवस) मोफत रक्तसंक्रमण, घरापासून आरोग्य संस्थेपर्यंत, एका आरोग्य संस्थेतून दुसऱ्या आरोग्य संस्थेत तसेच आरोग्य संस्थेतून घरापर्यंत वाहतूक व्यवस्था या सेवा दिल्या जातात.
तसेच, या योजने अंतर्गत एका वर्षापर्यंतच्या आजारी बालकास उपचारासाठी आवश्यक औषधे व साहित्य, प्रयोगशाळेतील तपासण्या, मोफत रक्तसंक्रमण, घरापासून आरोग्य संस्थेपर्यंत, एका आरोग्य संस्थेतून दुसऱ्या आरोग्य संस्थेत तसेच आरोग्य संस्थेतून घरापर्यंत वाहतूक व्यवस्था या सेवा मोफत दिल्या जातात.
जन्मल्यापासून ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये जन्मापासून विकृती दोप, सकस व पौष्टिक आहाराचा अभाव, इतर आजार, मुलांच्या विकासामध्ये विलंब या चार विकारांसंबंधी प्रारंभिक तपासणी व उपचार केले जातात.
संबंधित शासकीय आरोग्य संस्थेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर गरोदरपणाच्या काळात, प्रसुती दरम्यान गरोदर महिलांना, प्रसुतीनंतर ४२ दिवसांपर्यंत व १ वर्षे वयापर्यंतच्या आजारी बालकास सेवा पुरविली जाते.
Post a Comment