Header Ads

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan (PMSMA) - प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan (PMSMA) - प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान


प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan (PMSMA)

        प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियाना (Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan (PMSMA)) चे आयोजन दर महिन्याच्या ९ तारखेला व ९ तारखेला रविवार किंवा सुट्टी असेल तर त्यापुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी राबविण्यात येते.

        या अभियानांतर्गत सर्व गरोदर मातांची गरोदरपणातील दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात एक सोनोग्राफी करण्यात येते. मोफत प्रयोगशाळा चाचण्या, लाभार्थीचा वैद्यकीय पूर्व इतिहास घेऊन तपासणी करुन व धोक्याची लक्षणे, गुंतागुंत व कोणतीही जोखीम नसल्याची खात्री करण्यात येते. प्रसुतीपूर्व तपासणीसाठी आलेल्या सर्व लाभार्थींचा रक्तदाब, पोटावरुन तपासणी व गर्भपिंडाच्या हृदयाचे ठोके तपासले जातात.

        शोधलेल्या सर्व अतिजोखमीच्या मातांना उच्च संस्थेमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले जाते आणि जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत उच्च संस्थेमध्ये योग्य ते उपचार दिले जातात. सर्व लाभार्थ्याला एमसीपी कार्ड देण्यात येते.

            अभियानाच्या दिवशी आलेल्या सर्व लाभार्थीचे गरोदरपणातील तपासणी, गरोदरपणातील धोक्याची लक्षणे, बाळाच्या जन्माची तयारी, गरोदरपणातील गुंतागुंतीची तयारी, लोहयुक्त गोळ्या व कॅल्शियम च्या गोळ्यांचे सेवनाचे महत्त्व, संस्थात्मक प्रसुती, संदर्भ सेवा – जननी सुरक्षा योजनेंतर्गत व जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत देण्यात येणारा लाभ, प्रसूतीपश्चात काळजी, स्तनपान व पूरक आहार, संस्थात्मक प्रसूती व प्रसूतीपश्चात कुटुंब नियोजनाबाबत समुपदेशन केले जाते.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.