Header Ads

स्व. श्रीमती सुषमा उर्फ उज्वला सुधीरकुमारजी मिश्रीकोटकर यांचे मरणोत्तर नेत्रदान Posthumous eye donation of Sushma Sudhirkumarji Mishrikotkar

सुषमा उर्फ उज्वला सुधीरकुमारजी मिश्रीकोटकर यांचे मरणोत्तर नेत्रदान Posthumous eye donation of Sushma Sudhirkumarji Mishrikotkar


 स्व. श्रीमती सुषमा उर्फ उज्वला सुधीरकुमारजी मिश्रीकोटकर यांचे मरणोत्तर नेत्रदान

दिशा इंटरनॅशनल आय बँक यांना देण्यात आले नेत्रकमळ

कारंजा (लाड) दि. ३ - येथील रहिवासी स्व. श्रीमती सुषमा सुधीरकुमारजी मिश्ररीकोटकर (वय ७०)  यांचे दिनांक  २ मे रोजी दुःखद निधन झाले. 

सुषमा उर्फ उज्वला सुधीरकुमारजी मिश्रीकोटकर यांचे मरणोत्तर नेत्रदान Posthumous eye donation of Sushma Sudhirkumarji Mishrikotkar


स्वर्गीय सुषमा मिश्रीकोटकर (Sushma Mishrikotkar)  यांची मुलगी सौ. गुंजन संदेश जिंतूरकर यांची आपल्या आईचे मरणोत्तर नेत्रदान (Posthumous eye donation) व्हावे अशी इच्छा असल्यामुळे  त्यांच्या या इच्छेचा मान ठेवत मिश्रीकोटकर व जिंतूरकर परिवाराने दुःखाचा डोगर बाजूला सारून जगातील व्यक्तींना जग पाहता यावे या उद्दात भावनेने परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्रीमती सुषमा सुधीरकुमारजी मिश्रीकोटकर यांचा नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला व अमरावती येथील दिशा ग्रुप द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्र पेढीला संपर्क केला.

दिशा इंटेरनॅशनल आय बँकेचे मेडिकल डायरेक्टर डॉ. मनीष तोटे,  हिमांशू बंड, सचिव  स्वप्निल  गावंडे, यांनी मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. 

या वेळी दिशा ग्रुप कारंजा (Disha group Karanja) चे डॉ शार्दुल डोणगावकर, डॉ विजय जवाहरमलानी, डॉ सुशील देशपांडे, डॉ उल्हास काटोले, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आशिष बंड, तसेच कारंजा येथील सन्माननीय व्यक्ती आमोद चवरे,  प्रज्वल गुलालकरी,  मनोज खोडके हे उपस्थित होते. नेत्रदान पूर्वीच्या कोविड चाचणी करिता कारंजा उपजिल्हारुग्णालयाचे चे वैद्यकिय अधीक्षक डॉ. नथुराम सांळूके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ भाऊसाहेब लहाने, नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ वर्षा कुंभार, चंदन वासनिक आणि आरोग्य सेवक सावन कोल्हे उपस्थित होते. 

या सेवाभावी कार्यात परिवारातील संदेश जिंतूरकर, विजय जिंतूरकर, निनाद जिंतूरकर,  सुहास भोंगाडे व परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळाने व कार्यकर्त्यांतर्फे मिश्रीकोटकर व जिंतूरकर कुटुंबियांचे आभार मानले. 

No comments

Powered by Blogger.