Header Ads

वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने २६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Crop damage in Washim district on 267 hectares due to unseasonal rain and hailstorm

वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने  २६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Crop damage in Washim district on 267 hectares due to unseasonal rain and hailstorm

वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने  २६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

सर्वाधिक नुकसान कारंजा तालुक्यात

        वाशिम दि.०३ (जिमाका) www.jantaparishad.com -जिल्ह्यात ०२ मे रोजी पडलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे २६७.३० हेक्टरवरील शेत पिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान कारंजा तालुक्यात झाले आहे (Karanja taluka suffered the most). या तालुक्यात १४०.२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.०२ मे रोजी जिल्ह्यात सरासरी ४२.७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. 

      अवकाळी पाऊस व गारपिटीने वाशिम तालुक्यात ५७.३० हेक्टरवरील पेरू, भाजीपाला,मुंग,कांदा, ज्वारी पिकाचे,रिसोड तालुक्यात ५८ हेक्टरमधील भाजीपाला व कांदा, मालेगाव तालुक्यात ११.८० हेक्टरमधील मुंग व कांदा, कारंजा तालुक्यात १४०.२० हेक्टरमधील भाजीपाला,मुंग, कांदा,भूईमुग, गहु, ज्वारी,निंबू,केळी,संत्रा,तीळ या शेतपीकाचे नुकसान झाल्याची व मौजे शेवती येथील दोन विहिरी खचल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.


No comments

Powered by Blogger.