Header Ads

Janani Suraksha Yojana (JSY) information in marathi : जननी सुरक्षा योजना

Janani Suraksha Yojana (JSY) information in marathi : जननी सुरक्षा योजना


जननी सुरक्षा योजना

Janani Suraksha Yojana (JSY)

        अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील सर्व गर्भवती महिला जननी सुरक्षा योजना (Janani Suraksha Yojana (JSY)) या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र आहेत. यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र्य रेषेखालील लाभार्थीची प्रसूती घरी झाल्यास ५०० रुपये, शहरी भागातील लाभार्थीची प्रसूती शासकीय किंवा शासन मान्य मानांकित आरोग्य संस्थेत झाल्यास ६०० रुपये, ग्रामीण भागातील लाभार्थीची प्रसूती शासकीय किंवा शासनमान्य मानांकित आरोग्य संस्थेत झाल्यास ७०० रूपये, तर सिझेरिअन शस्त्रक्रिया झाल्यास लाभार्थीस रू. १५०० चा लाभ देय आहे. या योजनेचा लाभ हा लाभार्थीच्या बँक खात्यावर डीबीटी, पीएफएमएसद्वारे धनादेशाद्वारे देण्यात येतो.

        या योजनेचा लाभ घेण्यासाठी रहिवासी दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे जोडावयाची आहेत. प्रसूती सेवा उपलब्ध असलेल्या सर्व शासकीय आरोग्य संस्था व शासन मानांकित खासगी आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर प्रसुतिनंतर ७ दिवसांच्या आत सेवा दिली जाते.

        जननी सुरक्षा योजना (Janani Suraksha Yojana (JSY)) योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या आशा,आरोग्य सेविका, किंवा जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.

No comments

Powered by Blogger.