Header Ads

आशा भोसले यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार - Lata Deenanath Mangeshkar Award 2023 to Asha Bhosle

आशा भोसले यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार - Lata Deenanath Mangeshkar Award 2023 to Asha Bhosle


आशा भोसले यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

Lata Deenanath Mangeshkar Award 2023 to Asha Bhosle

        मुंबई - यावर्षीच्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यंदा या पुरस्काराच्या मानकरी ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Lata Deenanath Mangeshkar Award 2023 to Asha Bhosle) ठरल्या आहेत. दरम्यान, विद्या बालन (Vidya Balan), पंकज उदास (Pankaj Udas), प्रसाद ओक (Prasad Oak) यांच्यासह अनेकांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, गायिका उषा मंगेशकर (Usha Mangeshkar) यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. पुरस्कारांचा वितरण सोहळा २४ एप्रिल रोजी पार पडणार आहे.

        दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८१ व्या स्मृतिदिनानिमित्त जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये या पुरस्काराविषयी माहिती देण्यात आली आहे. मंगेशकर कुटुंब गेल्या ३३ वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे हा सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट चालवत आहेत. दरम्यान मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो. यंदाचा प्रतिष्ठित दीनानाथ पुरस्कार आणि ट्रस्टच्या इतर पुरस्कारांचा वितरण सोहळा २४ एप्रिल २0२३ रोजी पार पडणार आहे. मुंबईतील सायन याठिकाणी असणा?्या श्री षण्मुखानंद हॉल इथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. २४ एप्रिल रोजी मास्टर दीनानाथजींच्या स्मृतिदिनी हा सोहळा होईल.

            दरम्यान गेल्या वर्षीपासून, मंगेशकर कुटुंबीय आणि ट्रस्टकडून भारतरत्न  लता दीदींच्या स्मरणार्थ लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दिला जातो. तो. हा पुरस्कार दरवर्षी फक्त एकाच अशा व्यक्तीला दिला जातो ज्याने आपल्या राष्ट्रासाठी, लोकांसाठी आणि समाजासाठी अतुलनीय, नेत्रदीपक आणि अनुकरणीय योगदान आशा भोसले यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दिले आहे. गेल्यावर्षी या पुरस्काराचे मानकरी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ठरले होते. यावर्षी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार लतादीदींच्या लहान बहिणीला अर्थात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना प्रदान केला जाईल. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

No comments

Powered by Blogger.