Header Ads

विदर्भातील शाळा ३० जूनपासून तर राज्यातील शाळा १५ जूनपासून - Maharashtra Schools to start from 15 June

विदर्भातील शाळा ३० जूनपासून तर राज्यातील शाळा १५ जूनपासून - Maharashtra Schools to start from 15 June


विदर्भातील शाळा ३० जूनपासून तर राज्यातील शाळा १५ जूनपासून

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

         मुंबई दि १९ - राज्यातील शाळा यंदा १५ जून रोजी तर विदर्भातील शाळा उन्हाची तीव्रता जास्त असल्याने ३0 जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मुलांना आपल्या सुट्या व्यवस्थित प्लान करता याव्यात यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

        केंद्राचा नवभारत साक्षरता कार्यक्रम घेतला जाणार आहे. यापुढे शासकिय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवी मुलांचे शाळेचे कपडे, वह्या, शूज आणि सॉक्स हे शासनातर्फे मोफत दिले जाणार आहेत. तसेच प्रत्येक धड्यानंतर आता एक पान कोरे ठेवले जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षात एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे आजी आजोबा दिवस साजरा केला जाणार आहे असं दिपक केसरकर यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण दिले जाणार. २0 मे पयर्ंत सर्व त्रूटी पूर्ण करणा?्या शिक्षकांना अनुदान देण्यात येणार आहे. शिक्षक सेवकांच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीमध्येही वाढ करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी इंटरनेटद्वारे माहिती दिली जाईल आणि स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. कमी पटसंख्येंच्या शाळा बंद कराव्या लागू नयेत यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. पायाभूत सुविधा वाढवल्या जाणार आहेत. मराठीकडे आकर्षित करण्यासाठी उच्च शिक्षणही मराठीमध्ये करणार आहोत. मुलाच्या शाळेतील पहिल्या पावलाचे स्वागत केले जाणार आहे.

        बालभारती पुस्तक आम्ही ९0 टक्के मुलांना मोफत पुस्तक देतोय. पण कागदाच्या किंमती वाढत असल्याने त्याच्या किमतीत ३0 टक्के वाढ करण्यात आली आहे.

No comments

Powered by Blogger.