Header Ads

कारंजा येथे राज्यसरकारी कर्मचारी संपात उस्फुर्तपणें सहभागी - State government employees strike at Karanja

 

कारंजा येथे राज्यसरकारी कर्मचारी संपात उस्फुर्तपणें सहभागी - State government employees strike at Karanja

कारंजा येथे राज्यसरकारी कर्मचारी संपात उस्फुर्तपणें सहभागी

बेमुदत संपाचा दुसरा दिवस

तहसीलदार मांजरे व गटशिक्षणाधिकारी माने यांची उपस्थिति व मार्गदर्शन

        कारंजा (www.jantaparishad.com) दि १५ - दिनांक १४/०३/२०२३ मंगळवार पासुन पुकारलेल्या बेमुदत संपात राज्य सरकारी कर्मचारी दुसऱ्या दिवसी कारंजा तहसील कार्यालयात येथे आयोजित संपात ऊस्फुर्तपणे  सहभागी झाले. बेमुदत संपाच्या दुसऱ्या दिवसी तहसीलदार धीरज मांजरे व गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. 

      सदर संपात मध्ये प्रामुख्याने महसूल विभाग, आरोग्य विभाग, ग्रामसेवक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,नगर परिषद कर्म.यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी उपस्थितांनी संपाबाबत उद्बोधन केले. पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष इरफान मिर्झा, साने गुरुजी शिक्षक सेवा संघाचे सचिव नंदकिशोर भोयर, उर्दू शिक्षक संघटनेचे शमीम फरहात, आदर्श बहुजन शिक्षक संघटनेचे सचिव विनोद सुरवाडे,शिक्षक समितीचे संजय शंकरपुरे, माध्यमिक शिक्षक संघाचे प्रशांत भगत, शिक्षण संघर्ष संघटने चे कार्याध्यक्ष विजय भड, म.रा जुनी पेंशन हक्क संघटनचे अध्यक्ष निलेश कानडे, कारंजा तालुका सचिव राहुल गावंडे, ग्रामसेवक संघटनेचे गावंडे, आरोग्य संघटनेचे एस .टी सोनोने,शिक्षिका  मनिषा जगताप,महसूल विभागाचे राजेश सरोदे, ग्रामसेवक संघटनेचे अमोल पाटिल आदिनी आपले मनोगत व्यक्त केले.

सदर संपाला कारंजा तहसीलचे तहसीलदार धीरज मांजरे व कारंजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने, नायब तहसीलदार दामोदर पाचारणे यांनी उपस्थित राहून व जूनी पेन्शनची टोपी परिधान केली व संपकर्याना  उद्बोधन केल्यामुळे उपस्थितांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.सदर संपाला जका खान, हमीद शेख, बंडूभाऊ इंगोले, आरिफ पोपटे आदि पत्रकार बांधवानी भेट दिली. जुन्या पेंशन ची मागणी पूर्ण होई पर्यन्त बेमुदत संप सुरुच राहिल ऐसे संपकरी मंडळीने ठरविले.

No comments

Powered by Blogger.