Header Ads

१७ मार्च रोजी रिसोड येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा - Pandit Dindayal Upadhyay Employment Fair at Risod on 17th March

१७ मार्च रोजी रिसोड येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा - Pandit Dindayal Upadhyay Employment Fair at Risod on 17th March


१७ मार्च रोजी रिसोड येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

       वाशिम, दि. 15 www.jantaparishad.com (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केन्द्र,वाशिम कार्यालयाकडुन पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन १७ मार्च २०२३ रोजी  पंचायत समिती सभागृह रिसोड येथे करण्यात आले आहे. (Pandit Dindayal Upadhyay Employment Fair at Risod on 17th March)

          या रोजगार मेळाव्यात वाशिम जिल्हयासह राज्यातील परम स्किल्स ट्रेनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, औरंगाबाद (Param Skills Training India Private Limited, Aurangabad), पिपल ट्री व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड,अमरावती (People Tree Ventures Private Limited, Amravati), एलआयसी ऑफ इंडिया शाखा वाशिम (LIC Washim) आणि समता फाऊंन्डेशन, रिसोड (Samata Foundation Risod) येथील नामांकित आस्थापना/कंपन्यांमध्ये ६० रिक्त जागेवर रोजगार मिळविण्याची संधी जिल्हयातील नोकरी इच्छुक उमेदवारांना प्राप्त होणार आहे. जिल्हयातील रोजगार इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवारांना www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम देत सहभागी होता येणार आहे. रोजगार मेळाव्यात इ. १० वी, १२ वी, स्थापत्य पदविका, कृषि पदविका, आयटीआय सर्व ट्रेड, इतर सर्वशाखीय पदवीधर असणाऱ्या रोजगार इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवारांना सेवायोजन कार्डच्या युझरनेम व पासवर्डमधून मेळाव्यात सहभागी होता येईल. सहभागी झालेल्या उमेदवारांना उद्योजकांकडून ऑफलाईन पध्दतीने मुलाखत घेवून निवड करण्यात येणार आहे.

रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी होण्याची प्रक्रीया/पध्दत पुढीलप्रमाणे आहे.

www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील Job Seeker वरील Forth Comming Pandit Dindayal

        Upadhyay Job Fairs या खाली View All वर क्लिक करून washim जिल्हा सिलेक्ट करुन सर्च करावे.नंतर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम यांच्या वतीने रिसोड येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा या नावाने रोजगार मेळावा दिसेल त्या समोरील View More वर क्लिक करुन View Vacancies क्लिक करावे.त्यानंतर पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा मधील रिक्त पदे दिसतील. त्यासमोर APPLY करावे.त्यानंतर (Please login or register to apply the Jobfair vacancies other than Aurangabad District Joblair, Please close the next Pop up and then Login or Register) असा मॅसेज दिसेल त्यानंतर OK करुन आपल्याकडील www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करावा.

        या पध्दतीने आपण या ऑनलाईन मेळाव्यात सहभागी झालेले असाल. काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम यांचे दूरध्वनी क्रमांक ०७२५२- २३१४९४ अथवा भ्रमणध्वनी क्रमांक ९८५०९८३३५, ८६६८२५६५००, ७८७५७९८६८४ यावर संपर्क करावा.

           जिल्हयातील रोजगार इच्छुक स्त्री/पुरुष उमेदवारांसाठी १७ मार्च रोजीच्या रोजगार मेळाव्यात पसंतीक्रम/सहभाग नोंदवावा.असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.