Header Ads

कारंजा येथे ब्ल्यु डार्ट कुरिअर कंपनीत चोरी - Theft at Blue Dart Courier Company in Karanja

कारंजा येथे ब्ल्यु डार्ट कुरिअर कंपनीत चोरी 

कारंजा शहर पोलिसांनी केली मुद्देमालासह चोरट्यांना अटक 

कारंजा येथे ब्ल्यु डार्ट कुरिअर कंपनीत चोरी  - Theft at Blue Dart Courier Company in Karanja

        कारंजा (www.jantaparishad.com) दि. 15 - पोस्टे कारंजा शहर येथे दि.13/03/2023 रोजी फिर्यादी प्रविणकुमार खुशालचंद गुप्ता व्यवसाय असिस्टेंन्ट मॅनेजर ब्ल्यु डार्ट कंपनी ( कुरिअर सेवा) रा. काटोल रोड नागपुर यांनी पोस्टे येवुन तक्रार दिली की, त्याचे कारंजा येथील ब्ल्यु डार्ट कंपनी ( कुरिअर सेवा) (Blue Dart Courier Company in Karanja) चे कारंजा येथील मँनेजर शुभम सुभाष कांबळे रा. मुर्तीजापुर यांनी फिर्यादी यांना फोन करुन माहीती दिली की, आँफीस मधुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने दि. 11/03/2023 चे रात्री दरम्यान आँफीस शटर चे कुलुप कापुण आत प्रवेश करुन आँफीस मधील एकुण 13 पार्सल 32,394/- रु चे तसेच आँफीस चा जुना वापरता डेल कंपनीता लँप टाँप कीं.40,000/- रु व लोखंडी अलमारीचा मागील पत्रा कापुन नगदी 2,48,753/- रु असा एकुण 3,21,147/- रु चा माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे. अशा रिपोर्ट वरुण गुन्हा दाखल करुण तपासात घेतला.

        तपासा दरम्यान सदर कुरिअर सेवा आँफीस मधील कर्मचारी यांचेवर संशय आल्याने त्यांना विश्वासात घेवुव त्यांचे वेगवेगळे जबाब नोंदविले असता सदर कुरिअर आँफीस मधील मँनेजर शुभम सुभाष कांबळे रा. मुर्तीजापुर याने त्याचा मुर्तीजापुर येथील मित्र ऋषिकेश शंकरराव हीवराळे याचे मदतीने सदरची चोरी केल्याचे कबुली दिल्यावरुन त्यांना अटक करुण त्यांचे ताब्यातुन नगदी 1,70,000/-, 13 पार्सल पैकी 02 पार्सल कीं. 2700/-, तसेच लोखंडी अलमारी कापण्याकरिता वापरलेली ग्राईंडर मशीन कीं. 2000/- असा एकुण 1,74,700/- रु चा माल हस्तगत करण्यात आला असुन गुन्हयात चोरी गेलेला इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात येते आहे. 

        सदरची कार्यावाही ही मा. पोलीस निरिक्षक श्री आधारसिंग सोनोने साहेब पोस्टे कारंजा शहर यांचे  मार्गदर्शनात पोउपनि बि.सी. रेघीवाले, नापोका उमेशकुमार बिबेकर ब.नं. 1017, पोका अमित भगत ब.न. 311, नितीन पाटील ब.नं. 338, गजानन शिंदे ब.न. 1409, चापोहेका बाळु ढगे ब.नं. 102 यांनी केली असुन पुढील तपास पोउपनि बि.सी.रेघीवाले करीत आहेत.

No comments

Powered by Blogger.