Header Ads

कारंजा-मानोरा तालुक्यातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची सभा संपन्न - Karanja manora retired police officer meeting



पोलीस वर्धापन दिनाचे औचित्याने कारंजा-मानोरा तालुक्यातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची सभा संपन्न

 तालुका स्तरावर संघटना स्थापन 

 कारंजा www.jantaparishad.com दि. २ - आज दिनांक 2/1/2023 रोजी मानोरा रोड स्थित विरंगुळा सभागृह येथे पोलीस वर्धापन दिन याचे औचित्य साधून 12/00 वाजता सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे मीटिंग चे आयोजन करण्यात आले होते. 

सदर मिटींगचे अध्यक्ष स्थान सेवानिवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी श्री बहाळे साहेब होते मिटींगला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक अरुणराव नांदगावकर ,चवरे साहेब तसेच परसरामजी राठोड साहेब,पाचडे काका व गणेशराव जाधव उपस्थित होते. त्यानंतर अध्यक्ष व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नंतर अध्यक्षीय भाषण होऊन संघटनेच्या निवड प्रक्रियेला सुरुवात झाली.

            मीटिंगमध्ये सर्वानुमते चर्चा करून ठराव घेऊन कारंजा व मानोरा तालुक्यातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सहमतीने तालुका स्तरावर संघटना स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून प्रदीप गणेशराव ठाकरे यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष म्हणून विष्णू भाऊ सिंग आडे यांची निवड करण्यात आली.तसेच सचिव म्हणून दीपक सरवरे यांची निवड करण्यात आली. तसेच कोषाध्यक्ष म्हणून सुभाषराव चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यानंतर सदस्य म्हणून विलास सोनवणे, साहेबराव राठोड, शंकरराव सोळंके, मनोहरराव पवार, परशुराम राठोड अशी 9 लोकांची बॉडी स्थापन करण्यात आली.

 त्यानंतर मनोहररावजी पवार यांनी सभेकरिता उपस्थित असलेले सर्व मान्यवर व आणि सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचे आभार प्रदर्शन केले व मीटिंगच्या अध्यक्षांच्या परवानगीने मीटिंग समाप्त करण्यात आली त्यानिमित्त सभेत उपस्थिता करिता जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

 सदरच्या सभेकरिता 35 ते 40 सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.