Header Ads

कंकुबाई माध्यमिक कन्या शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश - Kankubai Kanya Shala karanja lad scholarship exam news

कंकुबाई माध्यमिक कन्या शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश - Kankubai Kanya Shala karanja lad scholarship exam news

कंकुबाई माध्यमिक कन्या शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

कारंजा दि.०५ - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे तर्फे घेण्यात आलेल्या २०२१-२२ च्या शिष्यवृत्ती परीक्षेत कंकुबाई माध्यमिक कन्या शाळेचे विद्यार्थिनींनी सुयश संपादन केले आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.८ वी च्या चार विद्यार्थिनींनी गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. तसेच पूर्व उच्च प्रार्थमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी च्या गुणवत्ता यादीत दोन विद्यार्थिनींनी स्थान प्राप्त केले आहे.

कंकुबाई माध्यमिक कन्या शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश - Kankubai Kanya Shala karanja lad scholarship exam news


पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चार विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चार विद्यार्थिनींनी गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहेत. जिल्हानिहाय गुणवत्ता यादीमध्ये वाशिम जिल्ह्यातून खुशी आशिष शर्मा (०८), कस्तुरी जगदीश तायडे (१६), शर्वरी रत्नदिप चव्हाण (५३) व मनस्वी मनोज राठोड (५४) यांनी यश प्राप्त केले आहे. 

पूर्व उच्च प्रार्थमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दोन विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत

पूर्व उच्च प्रार्थमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दोन विद्यार्थिनींनी गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहेत. जिल्हानिहाय गुणवत्ता यादीमध्ये वाशिम जिल्ह्यातून परी आशिष शर्मा (३०) व राधिका संतोष निलखन (३३) यांनी यश प्राप्त केले आहे.

गुणवंत विद्यार्थिनींचे सर्वत्र अभिनंदन व कौतूक करण्यात येत आहे. 

No comments

Powered by Blogger.