Header Ads

कारंजा तालुका विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न - Karanja taluka science exhibition price ceremony

कारंजा तालुका विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न - Karanja taluka science exhibition price ceremony


कारंजा तालुका विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

कारंजा www.jantaparishad.com दि. २ - राज्य विज्ञान शिक्षण संस्था,रविनगर नागपूर,प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग  जिल्हा परिषद वाशीम, शिक्षण विभाग पंचायत समिती कारंजा,विज्ञान अध्यापक मंडळ  आणि ब्ल्यु चिप कॉन्व्हेंट कारंजा यांच्या सयुक्त विद्यमाने गुरुवार दि. 29 डिसेम्बर रोजी एक दिवसीय कारंजा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 4 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.



      प्रदर्शनाच्या समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कारंजा तहसीलचे तहसीलदार धिरजजी मांजरे तर प्रमुख अतिथी म्हणून आदिशक्ती महिला बहुउद्देश्यीय संस्थेचे संचालक प्रो.निर्मलसिंह ठाकुर,प्रा.आर.सी मुकवाने, कारंजा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी श्रीकांत माने व विदर्भ विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव विजय भड,ब्ल्यु चिप  कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका संगीता परळीकर,विज्ञान अध्यापक मंडळाचे जिल्हा सचिव मनीष गावंडे आदि मान्यवर उपस्थित होते.


            सदर प्रदर्शनीमध्ये प्राथमिक गटात 45, माध्यमिक गटात 35, शिक्षक गटात 06, अपूर्व विज्ञान मेळावा या गटात 26, अशा एकून 112 प्रतिकृतीची मांडणी करण्यात आली होती.या प्रदर्शनाचे परीक्षण विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव मनिष गावंडे यांच्या उपस्थितित करण्यात आले.



समारोपीय कार्यक्रमात आदिशक्ती महिला बहुउद्देश्यीय संस्थेचे संचालक प्रो.निर्मलसिंह ठाकुर, प्रा.आर.सी मुकवाने,कारंजा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी श्रीकांत माने व विदर्भ विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव विजय भड       आदि मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर अध्यक्षीय भाषणात तहसीलदार धीरज मांजरे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोण म्हणजे काय?विज्ञान सकारात्मक वापर आपल्या आयुष्यात कसा करावा? विज्ञानाने आपल्या जीवनात कसा बदल केला? याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या नंतर बक्षीस वितरण कार्यक्रमाला सुरुवात झाली.

              सदर प्रदर्शनात प्राथमिक विद्यार्थी गटात जे.सी.हायस्कूल कारंजाच्या क्षितिज नितिन केळतकर  यांनी सादर केलेल्या निसर्गाचे घेऊन निसर्गाला देणे या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक, आर.जे.सी प्राथमिक शाळा कारजांचा विभोर वैभव लाहोटी यांने सादर केलेल्या स्मार्ट झेब्रा क्रासिंग या प्रतिकृतीला  द्वितीय क्रमांक, विद्यारंभ स्कूल कारजांची आरती पुरुषोत्तम ढाकरे हीने सादर केलेल्या लॉकर सेक्युरिटी सिस्टम या प्रतिकृतीला तृतीय क्रमांक,

विद्याभारती इंग्लिश मीडियम शाळा कारजांच्या आराध्या राहुल सावंत हीने सादर केलेल्या केबल कार सुरक्षा या प्रतिकृतीला चौथा क्रमांक,झिल इंटरनैशनल

शाळा कारजांचा रवीसिंग भगवानसिंग राठोड यांने सादर केलेल्या रेल्वे स्टेशन या प्रतिकृतीला  पाचवा क्रमांक प्राप्त झाला.

माध्यमिक विद्यार्थी गटामध्ये ब्ल्यूचिप कॉन्व्हेंट कारंज्यांचा यश गणेश कुरकुरे याच्या स्मार्ट मिलिटरी रोबोट या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक,जिल्हा परिषद हायस्कूल कामरगावचा अनुज डीगाम्बर मोहोड़ यांच्या फार्मर फ्रेंडली या प्रतिकृतीला द्वितीय क्रमांक, आर.जे.सी शाळा कारजांचा अर्थव बाबाराव शिंदे यांने सादर केलेल्या टंजेन्ट थेरम या प्रतिकृतीला  तृतीय क्रमांक,बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डीचा रोहित गोपाल ठाकरे यांने सादर केलेल्या कंपर्टेबल हॉस्पिटल बेड या प्रतिकृतीला  चौथा क्रमांक,श्रीमती नागवाणी शाळा कारजांचा यशवंत कैलाश सोळके यांने सादर केलेल्या स्मार्ट रेल्वे स्टेशन या प्रतिकृतीला पाचवा क्रमांक या प्रतिकृतीचा समावेश आहे. शैक्षणिक साहित्य निर्मिती गटांमध्ये प्राथमिक शिक्षकांमधून प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा मोखड़चे शिक्षक इलियास खान  यांच्या एक्सपाडेड एंड प्लेस वैल्यू या शै.साहित्याला प्राप्त झाला, माध्यमिक शिक्षकांमधून रामराव आदिक हायस्कूल शेलुवाडाचे शिक्षक एच. एम खान यांच्या डिजिटल शैक्षणिक साहित्य या शैक्षणिक साहित्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.प्रयोगशाळा परिचर गटांमधून मुळजी जेठा उर्दू स्कूल कारंज्याचे प्रयोग शाळा परिचर सय्यद इज्जतुल्ला अताऊल्ला  यांनी तयार केलेल्या सहज सोपे प्रयोग या साधनाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.लोकसंख्या शिक्षण गटांमधून माध्यमिक शिक्षकांमध्ये जि. प. हायस्कूल कामरगाव येथील शिक्षक गोपाल वसंतराव खाडे यांनी तयार केलेले रोबोट या साहित्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.

     वरील सर्व प्रतिकृतीची व साहित्याची निवड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन करीता झालेली आहे. त्यासोबत अपूर्व विज्ञान मेळाव्यामध्ये सादर केलेल्या 26 प्रयोगांपैकी दहा प्रयोगाची निवड  जिल्हास्तरीय अपूर्व विज्ञान मेळावा करिता करण्यात आलेली आहे. त्यामध्ये वेदांत स्कूल पोहाचा रोशन सुरेश चांदुरकर याच्या लेज़र सेक्युरिटी अलार्म,आर.जे. चवरे हायस्कूल कारंजाचा चैत्यन अंबादास येवले यांचा ऑटोमैटिक गैस लीकेज,आप्पास्वामी विद्यालय वढवीचा गणेश प्रमोद राठोड याचे स्मार्ट पटोजेक्टर, करंजाच्या ब्ल्यु चिप कॉन्वेन्टची अक्षरा नरेंद्र बारसे हिचा फ्लड रजिस्टेन्ट हाउस,जिल्हा परिषद हायस्कूल कामरगावची राधिका विकास देशमुख हिचा मैजिक कैप,जिल्हा परिषद शाळा आखदवाड़ाच्या श्रुतिका दिपक काकड हिच्या वाटर लेवल अलार्म ,एम.बी आश्रम हायस्कूल कारंजाची कल्याणी मनोहर जाधव हिचा फायर अलार्म,विद्यारंभ स्कूल कारंजा येथील नैतिक अतुल गायकवाड हिच्या एयर गन,एस. एन सी स्कूल काली कारंजाच्या यशस्वी दिपक मकडिया हिचे एप्पलीकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री,आर.एल कन्या हायस्कूल कारंजाची आरती गोपाल कानडे हीच्या रोधची एकसर जोडनी या प्रयोगांचा समावेश आहे .

           सर्व विजेत्या बालशास्त्रज्ञांना त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

      समारोपीय बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन कु.अमोल लिंगाटे तर आभार प्रदर्शन ब्ल्यु चिप कॉन्व्हेंट कारंज्याच्या मुख्याध्यापिका संगीता  परळीकर यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमाला कारंजा तालुक्यातील बहुसंख्य बालवैज्ञानिक व त्यांच्ये मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.