Header Ads

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुक २०२३ : वाशिम जिल्ह्यात १५ हजार ४४ मतदार - Voters in Washim district : Amravati Graduate Constituency Election 2023 news 02

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुक २०२३ : वाशिम जिल्ह्यात १५ हजार ४४ मतदार - Voters in Washim district : Amravati Graduate Constituency Election 2023 news 02


अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुक २०२३

वाशिम जिल्ह्यातील १५ हजार ४४ मतदार बजावणार मतदानाचा हक्क 

आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे प्रशासनाचे आवाहन

       वाशिम www.jantaparishad.com दि. ०४ (जिमाका) - अमरावती पदवीधर मतदारसंघ  सार्वत्रिक निवडणुकीचा (Amravati Graduate Constituency Election 2023) कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. निवडणुक आयोगाने या मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित केल्यापासून ते या निवडणुकीचा निकाल जाहिर होईपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहणार आहे. आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे. असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदिप महाजन यांनी केले आहे.

          जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आज 4 जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री.महाजन पुढे म्हणाले, 30 जानेवारी 2023 रोजी अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी मतदान आणि 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 5 जानेवारी 2023 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. 12 जानेवारीपर्यंत नामनिर्देशन पत्रे सादर करता येतील. 13 जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येईल. 16 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणे, 30 जानेवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.यासाठी नोडल अधिकारी अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार हे असतील.

         वाशिम जिल्हयातील अंतिम पदवीधर मतदारांचा (voters in washim district) तपशिल पुढीलप्रमाणे आहे. मालेगांव तालुका - 1180 पुरुष, 247 स्त्री असे एकूण 1427 मतदार, रिसोड तालुका - 1874 पुरुष, 455 स्त्री असे एकूण 2329 मतदार, वाशिम तालुका - 3453 पुरुष, 1286 स्त्री एकूण 4739 मतदार, मंगरुळपीर तालुका - 1504 पुरुष, 510 स्त्री एकूण 2014 मतदार, कारंजा तालुका - 2335 पुरुष, 1227 स्त्री एकूण 3562 मतदार आणि मानोरा तालुक्यात 732 पुरुष, 241 स्त्री असे एकूण 973 मतदार आहे. जिल्हयात एकूण 11 हजार 78 पुरुष आणि 3 हजार 966 स्त्री असे एकूण 15 हजार 44 पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी जिल्हयात एकूण 26 मतदान केंद्राची निर्मिती करण्यात येणार असल्याचे श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

No comments

Powered by Blogger.