Header Ads

श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या ७२३ व्या जन्मोत्सवास उद्या दिनांक २५ डिसेंबर पासून सुरुवात - shri guru maharaj janmotsav 2023 Karanja lad

श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या ७२३ व्या जन्मोत्सवास उद्या दिनांक २५ डिसेंबर पासून सुरुवात - shri guru maharaj janmotsav 2023 Karanja lad


श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या ७२३ व्या जन्मोत्सवास उद्या दिनांक २५ डिसेंबर पासून सुरुवात 

कारंजा www.jantaparishad.com दि.२४ - कारंजा लाड (Karanja lad) शहराचे ग्राम दैवत श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज (Sri Narasimha Saraswati Swami Maharaj) यांच्या ७२३ व्या जन्मोत्सवाच्या (723 rd Janmotsav) सोहळ्यास  उद्या पौष शु. द्वितीया म्हणजेच दिनांक २५ डिसेंबर २०२२ पासून सुरुवात होत आहे. श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा च्या गजरात, हर्षोल्लासात भावीक भक्त जन्मोत्सवाचा ४५ दिवसांचा भक्ती सोहळा, जन्मोत्सवाचा सोहळा  साजरा करणार आहे.  

उत्सवाच्या या ४५ दिवसांच्या भक्तीमेळ्यात दररोज विविध प्रकारचे भजन, किर्तन, आध्यात्मीक वाचन, गायन, प्रवचन, भक्तीसंगीत सह नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणेसाठी ठरावीक दिवशी वैद्यकीय शिबीर ही घेण्यात येणार आहे. 

उद्याच्या प्रथम दिवशी श्री गुरुमाऊलींच्या जन्मदिवसाचे पौष शु. द्वितीया दिनी जन्मोत्सवाची सुरुवात कलश स्थापनेने होणार असून श्री गुरुचरित्र पारायणास सुरुवात होईल. श्री अखंडविणा वादनास प्रारंभ केला जाणार असून दुपारी १२ वाजता श्रीं च्या जन्म मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. दररोज सायंकाळी ६ ते ७ या वेळेत श्री श्याम देशमुख यांचे हरिपाठी ही नियमीतपणे होणार आहे. 

४५ दिवसांच्या या जन्मोत्सवाची सांगतेच्या पुर्वी गुरुवार दिनांक २ फेबु्रवारी रोजी रुद्र स्वाहाकार व शतचंडी तसेच स्वाहाकार यज्ञास प्रारंभ होणार आहे. तर दि. ६ फेबु्रवारी २०२३ रोजी यज्ञ पुर्णाहुती नंतर श्रींची आरती, दुपारी १२ ते ४ महाप्रसाद व त्यानंतर सायंकाळी ७ वाजेपासून श्रीं ची पालखी नगरातून शोभायात्रा काढून शैलगमन यात्रेने (Shailgaman Yatra) जन्मोत्सवाची सांगता होणार आहे.

उत्सव काळात अनेक मान्यवर, संत, किर्तनकार, गायक, प्रवचनकार, भजनी मंडळ आपली सेवा श्रीं गुरुमाऊलीच्या चरणी अर्पण करतील. तरी या जन्मोत्सव सोहळ्याचा लाभ गुरुभक्तांनी घ्यावा, असे आवाहन श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान, कारंजा (दत्त) जि.वाशिम यांनी केले आहे. 

No comments

Powered by Blogger.