Header Ads

आयटीआय मंगरुळपीर येथे २९ डिसेंबर रोजी रोजगार मेळावा - Employment fair at ITI Mangrulpir on 29th December

आयटीआय मंगरुळपीर येथे २९ डिसेंबर रोजी रोजगार मेळावा - Employment fair at ITI Mangrulpir on 29th December


आयटीआय मंगरुळपीर येथे २९ डिसेंबर रोजी रोजगार मेळावा

विविध प्रकारच्या पदनामांकरीता २१५ पेक्षा जास्त रिक्त पदावर रोजगार मिळवण्याची संधी

१० वी, १२ वी, ITI (इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड), पदवीधर (कला/वाणिज्य/विज्ञान) व इंजिनिअरींग डिप्लोमा असणाऱ्यांना संधी 

       वाशिम, www.jantaparishad.com दि. २७ (जिमाका) : रोजगार, उद्योजकता नाविन्यता विभागांतर्गत नोकरी इच्छुक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याकरीता पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. जिल्हयातील रोजगार इच्छुक उमेदवारांना विविध क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,वाशिम व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मंगरुळपीर यांच्या वतीने २९ डिसेंबर २०२२ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय) मंगरुळपीर येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

            या मेळाव्यात राज्यातील नामांकीत उद्योजक/प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखतीव्दारे नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार देण्यासाठी सहभागी होत आहे. रोजगार इच्छुक उमेदवारांकडे इयत्ता १० वी, इयत्ता १२ वी, आय.टी.आय. (इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड), पदवीधर (कला/वाणिज्य/विज्ञान) व इंजिनिअरींग डिप्लोमा इत्यादी शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

     रोजगार इच्छुक उमेदवाराचे वय १८ ते ४५ या वयोगटातील असावे. या वयोगटातील युवक-युवती उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. विविध प्रकारच्या पदनामांकरीता २१५ पेक्षा जास्त रिक्त पदावर रोजगार मिळवण्याची संधी प्राप्त होणार आहे. इच्छुक युवक-युवती उमेदवारांना  www.mahaswayam.gov.in  आणि  www.nic.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने विविध पदासाठी शैक्षणिक पात्रतेनुसार ऑनलाईन पध्दतीने सहभाग नोंदवता येणार आहे.

          तरी २९ डिसेंबर २०२२ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय) मंगरुळपीर येथे उमेदवारांनी त्यांच्या २ पासपोर्ट साईजच्या फोटोसह आधार कार्ड व शैक्षणिक पात्रतेच्या झेरॉक्स प्रती सोबत घेऊन तोंडावर मास्क घालून प्रत्यक्षपणे उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त, सुनंदा बजाज यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी कार्यालयाचे दुरध्वनी क्र. 07252-231494 व भ्रमणध्वनी क्र.9850983335,9096855798 व 8208043122 यावर संपर्क साधावा.

No comments

Powered by Blogger.