Header Ads

समृद्धी महामार्ग बाबत थोडक्यात माहिती - Information about Samruddhi Mahamarg / Highway

समृद्धी महामार्ग बाबत थोडक्यात माहिती - Information about Samruddhi Mahamarg / Highway


पाहणी दौरा.. रस्त्याची भव्यता आणि गतीचा थरार..!

        नागपूर, दि. 4 : पाहणी दौरा… रस्त्याची भव्य रूंदी…गतीचा थरार…. विदर्भासाठी खऱ्या अर्थाने ‘समृद्धी’चा महामार्ग ठरू शकणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान आज उत्साहवर्धक चित्र पाहायला मिळाले… निमित्त होते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांच्या समृद्धी महामार्गा (Samruddhi Mahamarg / Highway) च्या पाहणी दौऱ्याचे.

        कुठल्याही देशाच्या विकासात रस्ते विकासाचे जाळे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते, असे म्हणतात. देशाच्या विकासाचा मानबिंदू हा रस्ते असतो. या रस्त्यांचे जाळे गतिमान असेल तर गतिमान विकासाला चालना मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यात 11 डिसेंबर रोजी लोकार्पण होत असलेला हिंदुहृदयसम्राट महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा विदर्भाला पर्यायाने राज्याला अग्रेसर करण्याचे एक माध्यम ठरणार आहे. त्यामुळे पाहणी दौऱ्याचा उत्साह आज शिगेला पोहोचला होता. या उत्साहानंतर खऱ्या अर्थाने या रस्त्याची भव्यता आणि गतीचा थरार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना आज अनुभवायला मिळाला. लवकरच तो सर्वसामान्यांनाही अनुभवायला मिळणार आहे.

            राज्याच्या विकासात अत्यंत मोलाची भूमिका बजावणऱ्या समृद्धी महामार्गाविषयी एक आपुलकीचे चित्र आज समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान पहायला मिळाले. नागपूरपासून सुरू झालेला हा दौरा शिर्डीपर्यंत आयोजित करण्यात आला. विमानतळापासूनच याचा प्रत्यय आलेला पहायला मिळाला. विमानतळावर अनेक नागरिक हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना भेटायला, आभार मानायला उत्सुक होते.

            विदर्भवासीयांचे अनेक वर्षांचे स्वप्न लवकरच साकार होणार असल्याचा आनंद वैदर्भीयांच्या चेहऱ्यावर पहायला मिळाला. केवळ विमानतळावरच नव्हे तर पाहणी दौऱ्याच्या झिरो पॅाईंट या ठिकाणीही स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांची कनेक्टिव्ही या महामार्गामुळे वाढणार असून यातून विदर्भाचा विकास होण्यास मदत होणार असल्याची प्रातिनिधिक प्रतिक्रिया स्थानिकांनी यावेळी दिली.

समृद्धी महामार्ग बाबत थोडक्यात माहिती

Information about Samruddhi Mahamarg / Highway

  • एकूण लांबी:- 701 किमी. ,
  • रस्त्याची रुंदी :-  120 मी. (डोंगराळ भागासाठी 90 मी.)
  • मार्गिका :- 3+3 मार्गिका
  • वाहन वेग प्रस्तावित :- 150 किमी/तास ( डोंगराळ भागासाठी 120 किमी./तास)
  • प्रस्तावित इंटरचेंजेंस :- 25
  • रस्त्यालगत उभारण्यात येणाऱ्या नवनगरांची संख्या:- 18
  • मोठे पूल :- 32
  • लहान पूल :- 317
  • बोगदे :- 7
  • रेल्वे ओव्हर ब्रिज :- 8
  • व्हाया डक्ट, फ्लाय ओव्हर :- 73
  • कल्व्हर्ट :- 762
  • किती जिल्हा, तालुका व गावातून जाणार :- 10 जिल्हे, 26 तालुके, 392 गावे
  • वे-साईड एमोनिटीज :- 20 (दोन्ही बाजूस मिळून)

No comments

Powered by Blogger.