Header Ads

महापरिनिर्वाण दिनानिमित्त कारंज्यात अभिवादन मोटार सायकल रॅलीचे आयोजन - Abhiwadan Motor Cycle Rally in Karanja lad



महापरिनिर्वाण दिनानिमित्त कारंज्यात अभिवादन मोटार सायकल रॅलीचे आयोजन - Abhiwadan Motor Cycle Rally in Karanja lad


महापरिनिर्वाण दिनानिमित्त कारंज्यात अभिवादन मोटार सायकल रॅलीचे आयोजन


        कारंजा www.jantaparishad.com दि ०४ - स्थानिक शहरात दरवर्षी प्रमाणे यंदाही विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिंसेबर 2022 रोजी सकाळी 8:30 वाजता अभिवादन मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

        रॅली सुरू होण्यापुर्वी डाँ.बाबासाहेब आंबेडकर चौकात अगोदर प्रतिमेच पुजन करण्यात येईल त्यानंतर रॅलीला सुरूवात होईल रॅली अतीशय शांतबद्ध पध्दतीने "बुद्धम् शरणम् गच्छामी" च्या गजरात डाँ.आंबेडकर चौकातुन, प्रारंभ होऊन जयस्तंभ चौक, नेहरू चौक, मेन रोड, नगिना मस्जीद, महात्मा फुले चौक, रामासावजी चौक, जिजामाता चौक, पोहावेस मार्गे, बायपास, झासीराणी चौकातुन, नविन बस स्टॅड मार्गे, अशोक नगर येथे रॅलीचा समारोप करण्यात येईल.

        तरी कारंजा तालुक्यातील व शहरातील समस्त आंबेडकरी जनतेने आपआपल्या मोटार सायकला पंचशिल, निळे ध्वज लाऊन रॅलीला उपस्थित राहण्याचे आवाहन डाँ.बाबासाहेब आंबेडकर अभिवादन रॅली समितीचे अध्यक्ष सचिन खांडेकर, उपाध्यक्ष महादेव ठोंबरे, रवी बनसोड, किशोर ऊके, श्याम घोडेस्वार, धम्मपाल कुळकर्णी, प्रविण मडामे यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.