Header Ads

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली समृध्दी महामार्गाची पाहणी - Inspection of Samruddhi Highway by CM and Deputy CM

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली समृध्दी महामार्गाची पाहणी - Inspection of Samruddhi Highway by CM and Deputy CM


मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली समृध्दी महामार्गाची पाहणी

     वाशिम दि.०४ (जिमाका) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis) यांनी आज ४ डिसेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाची पाहणी (Inspection of Samruddhi Highway) केली.

      या दौऱ्या दरम्यान त्यांनी जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर असलेल्या कारंजा टोल प्लाझा (Karanja Toll Plaza), शेलूबाजार टोल प्लाझा (Shelubazar Toll Plaza)मालेगाव टोल प्लाझा (Malegaon Toll Plaza) ची पाहणी केली.तसेच शेलुबाजार ते मालेगाव दरम्यान सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.मालेगाव तालुक्यातील वारंगी येथील समृध्दी महामार्गावरील बेस कॅम्प येथे मुख्यमंत्री श्री.शिंदे आणि श्री. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या आगमन प्रसंगी आमदार राजेंद्र पाटणी,विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,पोलीस अधीक्षक बच्चन सिंह व उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण यांची उपस्थिती होती.

     जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील दोनद(खुर्द) येथून सुरू होणारा समृद्धी महामार्ग मालेगाव तालुक्यातील केनवड येथून पुढे बुलढाणा जिल्ह्यात जातो.९७ किमीचा हा समृद्धी महामार्ग वाशिम जिल्हातून जातो.


No comments

Powered by Blogger.