Header Ads

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ - कलम १४४ : Gram Panchayat Election Maharashtra 2022 - Article 144

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ - कलम १४४  : Gram Panchayat Election Maharashtra 2022 - Article 144


ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022

17, 18 व 20 डिसेंबर रोजी कलम 144 लागू

       वाशिम, www.jantaparishad.com दि. 02 (जिमाका) : जिल्हयातील 287 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी येत्या 18 डिसेंबर रोजी मतदान आणि 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या काळात मतदान व मतमोजणीच्या दिवशी लोक राजकीय कारणावरुन विनाकारण भांडणतंटे करतात. त्याचे मोठया भांडणात किंवा घटनेत रुपांतर होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असते. या बाबींना प्रतिबंध घालण्यासाठी व निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने निवडणूकीची संपुर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून निवडणूकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याकरीता संबंधित निवडणूक क्षेत्रात 17 डिसेंबर रोजी सकाळी 6 ते 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजतापर्यंत आणि मतमोजणीच्या दिवशी 20 डिसेंबर रोजी मतमोजणीच्या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रीया सुरु झाल्यापासून ते मतमोजणीची संपुर्ण प्रक्रीया संपेपर्यंत फौजदारी दंड प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी लागू केले आहे.

             हे आदेश वरील कालावधीत लागू राहणार असल्यामुळे 17 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजतानंतर राजकीय पक्षांना प्रचार सभा घेता येणार नाही. निवडणूकीच्या संबंधाने धार्मिक स्थळांचा उपयोग करता येणार नाही. आचार संहितेच्या संपूर्ण काळात सार्वजनिक ठिकाणी शस्त्र जवळ बाळगता येणार नाही. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या ठिकाणी 100 मीटर परिसरात निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करता येणार नाही. मतमोजणीच्या ठिकाणी 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील. 

No comments

Powered by Blogger.