Header Ads

डॉ. नवलकिशोर हेडा यांची अध्यक्ष तर डॉ. नवल सारडा यांची सचिव पदी निवड : विदर्भ माहेश्वरी सेवा संघाच्या कारंजा तालुका कार्यकारणीची अविरोध निवड - Dr - Naval Kishor Heda selected taluka president of Vidarbha Maheshwari Seva Sangh

डॉ. नवलकिशोर हेडा यांची अध्यक्ष तर डॉ. नवल सारडा यांची सचिव पदी निवड : विदर्भ माहेश्वरी सेवा संघाच्या कारंजा तालुका कार्यकारणीची अविरोध निवड - Dr.Naval Kishor Heda selected taluka president of Vidarbha Maheshwari Seva Sangh


विदर्भ माहेश्वरी सेवा संघाच्या कारंजा तालुका कार्यकारणीची अविरोध निवड  

डॉ.नवल किशोर हेडा यांची अध्यक्षपदी तर डॉ.नवल सारडा यांची सचिव पदी निवड

        कारंजा www.jantaparishad.com दि.०५ - विदर्भ प्रदेशिक माहेश्वरी सेवा संस्थान अंतर्गत कारंजा तालुका कार्यकारणी ची  बैठक स्थानिक महेश भवन येथे पार पडली. या बैठकीला माहेश्वरी जिल्हा अध्यक्ष शिवलाल भुतडा, संघटन सचिव प्रा.कैलास मुंदडा यांची प्रमुख उपस्थिती होती.  यावेळी तालुका कार्यकारणी ची निवड बिनविरोध करण्यात आली. विदर्भ प्रदेशिक माहेश्वरी सेवा संघाच्या कारंजा तहसील संघटनेचे अध्यक्ष म्हणून डॉ.नवल किशोर हेडा तर  सचिव म्हणून डॉ.नवल सारडा यांची निवड करण्यात आली.

        वाशीम जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये तालुका कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. यावेळी प्राध्यापक कैलास मुंदडा व महासभा सदस्य शेखर बंग तसेच निवडणूक अधिकारी कृष्णा पल्लोर उपस्थित होते.      तालुका कार्यकारणी बिनविरोध  निवडण्यासाठी सामूहिक निर्णय झाल्याने तालुका कार्यकारणी ची निवड बिनविरोध करण्यात आली. त्यात कारंजा तहसील संघटनेचे अध्यक्ष डॉ.नवल किशोर हेडा व सचिव डॉ.नवल सारडा यांची निवड करण्यात आली . गेल्या सहा वर्षांत उत्कृष्ट कार्य करणारे माजी तालुका अध्यक्ष मनीष साबू यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

        कार्यकारिणी मध्ये राजेश बजाज ,भगवानदास तोतला, धीरज बंग, सहसचिव विनोद तापडिया, अभिषेक मालपाणी, खजिनदार  श्याम इंदाणी, संघटन मंत्री अजय बजाज, आणि  राजेश बजाज, सहसचिव विनोद तापडिया, अभिषेक मालपाणी  आदींची निवड करण्यात आली. तर तालुका कार्यकारणी प्रसिद्धी प्रमुख कृष्ण कुमार लाहोटी तर सदस्य पदी संजय बंग ,श्याम तापडिया,  मोतीलाल बंग, जगदीश जाखोटिया, शेषनारायण धूत, सचिन मुंदडा, प्रफुल्ल बाहेती, दिनेश मालाणी, रवीन्द्र  गिल्डा, विनोद चांडक, रमाकांत भुतडा, पवन सारडा, आनंद इनाणी, अर्पित बजाज, प्रतीक हेडा आदींची निवड करण्यात आली.  

        जिल्हा माहेश्‍वरी संस्थेने ग्रामीण भागापर्यंत पोहोचून शिक्षण क्षेत्रात, दर महिन्याला  समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून समाजातील गरीब घटकांना आर्थिक मदत केली, शिक्षणाचे क्षेत्र समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचविले. माहेश्‍वरी सेवा संघटना जिल्हा वाशिम या संस्थेने या आधी सुद्धा ज्यांना आर्थिक मदतीची गरज आहे, मग ते व्यवसाय असो अथवा शिक्षण असो समाजातील गरजवंत लोकांना  मदत केली आहे.  यावेळी जिल्हाध्यक्ष शिवलाल भुतडा यांनीही तालुका कार्यकारणीने समाज हिताच्या कार्यात सहभागी  होऊन त्यांना मदत करण्याचे आवाहन  केले. 

याप्रसंगी तालुकाध्यक्ष डॉ. नवल हेडा व सचीव डॉ. नवल सारडा यांनी येत्या कार्यकाळात समाजाकरीता भरीव कार्य करण्याचे मनोगत व्यक्त केले. 

याप्रसंगी अशोक इन्नाणी, दिलीप गिल्डा, सुभाष बजाज, ओमप्रकाश तापडिया, सुनील झंवर, सुरेश चांडक आदी मान्यवर उपस्थित होते.

संचलन मनीष साबुदाणा यांनी तर आभारप्रदर्शन दिलिप गिल्डा यांनी केले.

No comments

Powered by Blogger.