६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न - blood donation camp in karanja lad on occation of mahaparinirwan din
६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कारंजा येथे रक्तदान शिबिर संपन्न
कारंजा www.jantaparishad.com दि ०५ - सम्यक मित्र मंडळ, सिद्धार्थ बुद्ध विहार गौतम नगर कारंजा येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन उत्सवात संपन्न झाले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटक मा. देविदास गजभिये यांच्या शुभहस्ते करण्यात आले, अध्यक्षस्थानी निर्मलाबाई मेश्राम होत्या, तसेच वाशिम ब्लड सेंटरचे डॉक्टर उपस्थित होते. यावेळी डॉ. सागर तोडकर सर, मोनाली मॅडम, पूजा मॅडम, रेणुका मॅडम,तुषार बांगरे, गजानन मुकुटकर व तसेच सम्यक मित्र मंडळाच्या वतीने दिलीप भाऊ रोकडे, सूर्यकांत लांडगे, संतोष कांबळे, खुशाल राऊत, एडवोकेट पंकज सावळे, शिवा कांबळे,सिद्धार्थ वाकोडे तथा कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून रक्तदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. यामध्ये आदिल शेठ मरछिया, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे वाशिम जिल्हा संपर्कप्रमुख तथा कारंजा तालुका अध्यक्ष विलास राऊत यांनी सुद्धा रक्तदान करून महामानवास अभिवादन केले.
रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी बहुसंख्येने सहभागी होऊन रक्तदान केले. रक्तदान केल्यानंतर रक्तदात्यांना चहा, बिस्किट, सेफ, चिकू, नाश्ता देण्यात आला व त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप सुद्धा करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन दिलीप भाऊ रोकडे यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघाताई राऊत भारती बौद्ध महासभा यांनी केले व आभार प्रदर्शन शीला राऊत भारतीय बौद्ध महासभा ,तसेच समता सैनिक दलाच्या वतीने उपस्थितीत राहुल मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची बहुसंख्येने उपस्थित होते.
Post a Comment