Header Ads

महामानवाला अभिवादन, कारंजात भव्य मोटार सायकल रॅली संपन्न - Motor Cycle Rally in Karanja lad

महामानवाला अभिवादन, कारंजात भव्य मोटार सायकल रॅली संपन्न - Motor Cycle Rally in Karanja lad

महामानवाला अभिवादन, कारंजात भव्य मोटार सायकल रॅली संपन्न

        कारंजा दि ०६ - स्थानिक शहरात दरवर्षी प्रमाणे यंदाही विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिंसेबर 2022 रोजी सकाळी 9 वाजता भव्य अभिवादन मोटार सायकल रॅली काढण्यात आली. 

        रॅली सुरू होण्यापुर्वी डाँ.बाबासाहेब आंबेडकर चौकात अगोदर प्रतिमेचे पुजन व वंदन करण्यात आले, त्यानंतर रॅलीला सुरूवात करण्यात आली.  रॅली अतीशय शांतबद्ध पध्दतीने "बुद्धम् शरणम् गच्छामी" च्या गजरात तसेच समस्त बहूजन महापुरूषांना हारार्पंण करून डाँ.बाबासाहेब आंबेडकर चौकातुन, प्रारंभ होऊन जयस्तंभ चौक, नेहरू चौक, मेन रोड, नगिना मस्जीद, महात्मा फुले चौक, रामासावजी चौक, जिजामाता चौक, पोहावेस मार्गे, बायपास, झासीराणी चौकातुन, पुढे जाऊन नविन बस स्टॅड मार्गे, अशोक नगर येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. 

        या अभिवादन रॅलीला कारंजा तालुक्यातील समस्त आंबेडकरी अनुयायांनी  बहूसख्येंने आपआपल्या मोटार सायकल व पंचशिल, निळे ध्वज घेऊन रॅलीला उपस्थिती दर्शवून चांगला प्रतिसाद दिला. या रॅलीच्या यशस्वीतेसाठी डाँ.बाबासाहेब आंबेडकर अभिवादन मोटारसायकल रॅली समितीचे अध्यक्ष सचिन खांडेकर, उपाध्यक्ष महादेव ठोंबरे, सचिव रविभाऊ बनसोड, कोषाध्यक्ष किशोर उके, सहसचिव श्याम घोडेस्वार, रामेश्वर डेंडुळे, किशोर मानकर, संजय खाडे, प्रविण मडामे, धम्मपाल कुळकर्णी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रवीभाऊ बनसोड यांनी केले.

No comments

Powered by Blogger.