Header Ads

श्याम सवाई व सास टिम चा पालकमंत्री संजय राठोड यांचे हस्ते सत्कार - Shyam Sawai and Saas Team karanja lad felicitated by Guardian Minister Sanjay Rathod

श्याम सवाई व सास टिम चा पालकमंत्री संजय राठोड यांचे हस्ते सत्कार : Shyam Sawai and Saas Team karanja lad felicitated by Palakmantri

श्याम सवाई व सास टिम चा पालकमंत्री संजय राठोड यांचे हस्ते सत्कार

मानवतेचे कार्य करणारे सर्वधर्म मित्र मंडळ, सास जिल्हा प्रशासन कडून सन्मानित

        कारंजा लाड दि २२ - वाशिम जिल्हयामध्ये नैसगिक व मानवनिर्मीत आपत्ती च्या वेळी श्याम सवाई (Shyam Sawai) हे सर्वधर्म मित्र मंडळ (Sarvadharma Mitra Mandal), सास कंट्रोल रुम (Saas Control Room) व्दारे सतत मदती चा हात देणाऱ्या चळवळीत सक्रीय आहेत. सन 2006 पासून सर्वधर्म मित्र मंडळ, सास चे माध्यमातून तात्काळ मानवी कार्याचे दर्शन हे समस्त नागरिकांनी पहिले आहे तसेच अनुभवले देखील आहे.  26 वर्षा पासून सतत करत आलेले कार्य पाहून दि 21-10-22 रोजी दुपारी 3 वाजता जिल्हा नियोजन सामिती सभागृह  येथे पालकमंत्री मा.श्री संजय राठोड (Palakmantri Sanjay Rathod) यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, वाशिम द्वारे या कार्याचा गौरव म्हणून गौरवपत्र व स्मृती चिन्ह सर्वधर्म मित्र मंडळ, सास शोध व बचाव पथक कारंजा लाड (Karanja Lad) चे अध्यक्ष श्याम रामदास सवाई यांना प्रदान करण्यात आले. यावेळी कारंजा -मानोरा मतदार संघाचे आमदार मा.श्री राजेन्द्र पाटणी (MLA of Karanja-Manora Constituency Mr. Shri Rajendra Patni) यांनी श्याम सवाई च्या मानवता कार्य ची विशेष प्रशंसा करून श्याम हा 24 तास सेवेत असतो. त्यांच्या सास कंट्रोल् रुम ला रात्री 3 वाजता हि फोन केला तर तो मदती करीता तयार असतो असे आवर्जुन मा. पालकमंत्री श्री संजय राठोड साहेब यांच्या लक्षात आणून दिले. 

        या सत्कार कार्यक्रमा मध्ये पालकमंत्री संजय राठोड, आमदार राजेन्द्र पाटणी, आमदार किरण  सरनाईक, जिल्हाधिकारी शण्मूगराजन एस, मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वंसुधरा पंत, अप्पर पोलीस अधिक्षक गौरख भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत ,व इतर अधिकारी उपस्थित होते.  वाशिम जिल्हयामध्ये नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती वेळी मानवता कर्तव्य लक्षात घेता कर्तव्य सेवकानी प्राण धोक्यात घालून अनेकाचे प्राण वाचवले आहेत. तसेच जिल्हाप्रशासना च्या आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध उपाययोजना मध्ये व उपक्रमामध्ये वेळोवेळी बहूमोल सहकार्य केले व आपत्ती प्राशिक्षणामध्येही विशेष सहभाग दिलेला आहे. या बहूमोल योगदाना बदल, आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिना निमित्य गौरवपत्र व चिन्ह श्याम सवाई व त्यांच्या सोबत असलेले प्रतिनिधी अमोल लोणकर, अजय ढोक, अश्वीन तायडे, अरविंद राठोड या टिम ने सत्कार स्वीकार केला. 

        आज झालेला हा सन्मान हा वाशिम जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागातील सतत सास कंट्रोल रुम च्या मानवता कार्याशी जूळलेल्या प्रत्येक सदस्यच्या प्रर्थमदर्शनी तत्काळ मदती करीता पुढे येणाऱ्या प्रत्येकाचा आहे. असे श्याम सवाई यांनी सत्कार स्वीकारतांना भावना व्यक्त केल्या.  सास कंट्रोल रूम चे कार्य वाशिम जिल्हयात  होत असून प्रत्येक कर्तव्य सेवक चे योगदान या चळवळीत आहे असेही त्यांनी नमुद केले. तसेच कोठेही कोणतीही घटना दिसली तर प्रशासन व सास ला कळवावे असे अवाहन केले आहे.

No comments

Powered by Blogger.