Header Ads

वाशिम जिल्ह्यात ७ नोव्हेंबर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश : Prohibitory order in Washim district till November 7

वाशिम जिल्ह्यात ७ नोव्हेंबर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश : Prohibitory order in Washim district till November 7


वाशिम जिल्ह्यात ७ नोव्हेंबर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

         वाशिम, दि. २२ www.jantaparishad.com (जिमाका) -  जिल्ह्यात 23 ते 26 ऑक्टोबर या कालावधीत दिवाळी हा सण साजरा केला जाणार आहे. सद्यस्थितीत जैन धर्मियांचे आचार्य श्री. विद्यासागरजी महाराज हे शिरपूर (जैन) येथे चातुर्मासानिमित्त वास्तव्यास आहे. शिरपूर (जैन) येथे चातुर्मासाच्या काळात विविध धार्मीक कार्यक्रम व प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. याकरीता मोठया प्रमाणात जैन धर्मीय भाविक शिरपूर येथे येत आहे. तसेच विविध पक्ष/संघटना/ सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून वेगवेगळया मागण्याकरीता धरणे/आंदोलने/उपोषण करण्यात येत आहे. जिल्हा सण-उत्सवाच्या दृष्टिने संवेदनशील आहे. 

        सण उत्सवाच्या काळात जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे सोयीचे व्हावे यासाठी 24 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी लागू केले आहे. हे आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय/निमशासकीय अधिकारी- कर्मचारी किंवा विवाह, अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस व कार्यक्रमास लागू राहणार नाही.

No comments

Powered by Blogger.