Header Ads

विक्रेत्यांनी फटका विक्री दुकाने लावणे तसेच नागरिकांनी फटाके फोडणे बाबत प्रशासनाचे निर्देश - instructions - firecracker sellers and bursting

विक्रेत्यांनी फटका विक्री दुकाने लावणे तसेच नागरिकांनी फटाके फोडणे बाबत प्रशासनाचे निर्देश - instructions - firecracker sellers and bursting

विक्रेत्यांनी फटका विक्री दुकाने लावणे तसेच नागरिकांनी फटाके फोडणे बाबत प्रशासनाचे निर्देश 

         वाशिम, दि. 20  www.jantaparishad.com (जिमाका) :  जिल्हयात ग्रामीण व शहरी भागात दिवाळी उत्सव मोठया आनंदात व उत्साहात  साजरा करण्यात येतो. 

फटाका विक्रीची दुकाने खुल्या जागेत व पटांगणात


        दिवाळी उत्सवादरम्यान जिल्हयात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता संयुक्त मुख्य विस्फोटक, नियंत्रक पश्चिम विभाग, नवी मुंबई यांच्या २६ सप्टेंबर २०१८ रोजीच्या निर्देशानुसार फटाक्यांच्या दुकानांचे शेड हे आग प्रतिबंधक व पुर्णतः बंद असणे आवश्यक आहे. या शेडमध्ये कोणताही अनोळखी व्यक्ती प्रवेश करणार नाही याची व्यवस्था करण्यात यावी. फटाक्यांच्या दोन दुकानामधील अंतर हे ३ मिटर व प्रोटेक्ट वर्क पासून ५० मीटर अंतरावर असणे आवश्यक आहे. फटाक्यांच्या दुकानांची प्रवेशव्दारे एकमेकांकडे नसतील याची दक्षता घ्यावी. दुकानामधील लाईटची व्यवस्था दुकानांच्या भिंतीवर सुरक्षितपणे केलेली असावी. फटाक्यांची डिजीटल जाहिरातीची फलके दुकानांच्या ५० मिटर अंतरावर असावीत. एका दुकानामध्ये जास्तीत जास्त १०० किलोग्रॅम फायर वर्क्स किंवा ५०० किलोग्रॅम चायनीज, क्रेकर, स्पार्कलर्स स्फोटके ठेवली जातील याची दक्षता घ्यावी.

फटाका विक्रीची दुकाने खुल्या जागेत व पटांगणात

          सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार फटाक्यांच्या दुकानामध्ये ग्रीन फायर क्रेकर विकली जातील. या निकालानुसार नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी दिवाळीच्या कालावधीमध्ये फटाके रात्री ८ ते १० च्या दरम्यानच फोडावीत. फटाका विक्रीची दुकाने खुल्या जागेमध्ये/ पटांगणामध्ये विक्रीसाठी असणे आवश्यक आहे. त्यामुळे एखादी घटना घडल्यास कमीत कमी नुकसान होईल. सार्वजनिक ठिकाणी, निवासी इमारतीमध्ये, गर्दीच्या ठिकाणी फटाका विक्री आणि साठवणूक करण्यास मनाई करण्यात आल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी, वाशिम यांनी कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.