Header Ads

श्री महंत सागरानंद सरस्वती महाराज यांचे निधन : Shri Mahant Sagaranand Saraswati Maharaj passed away


त्र्यंबकेश्वर पंचायती आनंद आखाड्याचे अध्यक्ष

श्री महंत सागरानंद सरस्वती महाराज यांचे निधन

        नाशिक दि. 08 - अखिल भारतीय आखाडा परिषदचे माजी अध्यक्ष व त्र्यंबकेश्वर येथील पंचायती आनंद आखाड्याचे श्री महंत सागरानंद सरस्वती महाराज (Shri Mahant Sagaranand Saraswati Maharaj) यांचे आज पहाटे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 95 वर्ष होते.

         महंत सागरानंद सरस्वती महाराज यांचे मुळगाव नांदेड जिल्ह्यातील देवाची वाडी हे असून त्र्यंबकेश्वर येथील २००३ व २०१५ सालच्या कुंभमेळाचे ते अध्यक्ष होते. भारतात सर्व ठिकाणी भरणाऱ्या कुंभमेळ्यात महाराजांचा सक्रीय सहभाग होता. संत गाडगे महाराज यांचा सहवासात त्यांनी काही दिवस वास्तव्य केलेले होते. महंत सागरानंद सरस्वती महाराज हे त्र्यंबकेश्वर पंचायती आनंद आखाड्या (President Panchayati Anand Akhada Trimbakeshwar) चे गेल्या २५ वर्षापासून अध्यक्ष होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले अंत्यदर्शन


        श्री स्वामी सागरानंद सरस्वती गुरूकुल सेवा संघ त्र्यंबकेश्वर येथे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

        यावेळी बंदरे व खनिकर्म तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, वैद्यकीय शिक्षण व ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस महानिरिक्षक बी.जी.शेखर-पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमिशा मित्तल, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) सचिन पाटील, उपजिल्हाधिकारी नितिन मुंडावरे, तहसिलदार दिपक गिरासे,  प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.