Header Ads

'ईद-ए-मिलादुन्नबी' निमित्त कारंजा शहरात भव्य मिरवणूक - Eid-e-Miladunnabi : Grand procession in Karanja lad

'ईद-ए-मिलादुन्नबी' निमित्त कारंजा शहरात भव्य मिरवणूक - Eid-e-Miladunnabi : Grand procession in Karanja lad


'ईद-ए-मिलादुन्नबी' निमित्त कारंजा शहरात भव्य मिरवणूक

आकर्षक सजावट; विविध धार्मिक उपक्रम द्वारा सण साजरा 

        कारंजा दि ०९ - प्रेषित मोहंमद पैगंबर यांचा जन्मदिवस उर्दू महिन्याच्या १२ तारखेला म्हणजे आज दिनांक ९ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला. या निमित्त शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात शेकडो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.

Eid-e-Miladunnabi Karanja lad Pic 02 : 'ईद-ए-मिलादुन्नबी' कारंजा 02

             ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त सजवलेल्या गाड्या, हिरव्या पताका, शुभेच्छा फलक घेऊन आबालवृद्धांसह मदरशांचे विद्यार्थी मिरवणुकीत सहभागी होते. डोक्यावर पगडी, सदरा अशा पारंपरिक वेशात सहभागी मुस्लिम बांधवांनी शिस्तबद्ध मिरवणूक काढली. या वेळी इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत महंमद पैगंबर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काही वचने म्हणण्यात आली. 

Eid-e-Miladunnabi Karanja lad Pic 03 : 'ईद-ए-मिलादुन्नबी' कारंजा 03

            जुलूस-ए-मोहंमदी सकाळी ८.३० वाजता स्थनिक जामा मशीद येथून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. तेथून मुख्य मार्गाने फिरुन सराफा बाजार येथून परत जामा मशीदीमध्ये मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. प्रेषित मोहंमद पैगंबर यांनी जगाला दिलेली शांती आणि मानवतेची शिकवण समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावी हा यामागील उद्देश असल्याचे जाणकारांनी सांगितले. मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई, पताके, झेंडे लावून सजावट करण्यात आली होती. मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्यांसाठी सामाजिक संघटना कार्यकर्त्यांकडून अल्पोपहार व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. 

Eid-e-Miladunnabi Karanja lad Pic 04 : 'ईद-ए-मिलादुन्नबी' कारंजा 04

        मिरवणुकीत भारतीपूरा, मंगलवारा, क़ाज़ीपुरा, कागजीपुरा, डाफनीपूरा, मजीदपूरा, अस्ताना, बिबिसाहबपूरा, निझामपुरा गवळीपुरा या भागातील मंडळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. 

Eid-e-Miladunnabi Karanja lad Pic 04 : 'ईद-ए-मिलादुन्नबी' कारंजा 04

        मिरवणुकीत जामा मशीदीचे मौलाना अ. मजीद साहब, मौलाना क़ाज़ी मो.इक़बाल, मौलाना सैय्यद अहमद साहब, राष्ट्रवादी नेते हाजी मो.युसुफ पुंजानी, मा. नगराध्यक्ष दत्तराज डहाके, मा.उपाध्यक्ष एम.टी.खान, मा. उपाध्यक्ष जुम्मा पप्पूवाले, मा.गटनेते ॲड.फिरोज शेकुवाले, माजी नगरसेवक सलीम गारवे, अ.ऐजाज अ.मन्नान, जावेदोद्दीन, जाकीर शेख,युनूस पहेलवान,चाँद शाह,सलीम प्यारेवाले,आरिफ मौलाना,सैय्यद मुजाहिद, इरफान खान,अब्दुल रशीद, इर्शाद पहेलवान, ॲड. सुभान खेतीवाले, चांद मुन्नीवाले, रहमान नंदावाले, काझी रफ़िउल्लाह, मिर्जा जुबेर बेग, बाबू चाउस, बिसू पहेलवान, डॉ. इस्तियाक अली,हाजी युनुस रुलानी, उस्मान खान, माजी नगरसेवक अनिस खान बशीर खान,  हुसैन बंदूकवाले, रफत काझी, प्रा. सी.पी.शेकुवाले, आरिफ पोपटे, आमिर पठान, इफ्तेखार मिर्जा,जुनेद मिर्जा, सदीम काझी, हाजी सदरोद्दीन पटेल, बदरोद्दीन पटेल, रज्जाक पटेल,जुम्मा बंदूकवाले, निजाम पटेल, पूर्व नगरध्यक्ष अरविंद लाठिया, संदेश जिंतुरकर, राझिक शेख, इमरान शेख, ग्यासू मिर्झा, हाफिज राज, कादर खान एआईएमआईएम के शहाराध्यक्ष नसीरोद्दीन खतीब, यासिर खान, यूसुफ मौलाना यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी,सदस्य तसेच बहुसंख्य मुस्लिम बांधवांनी उपस्थिती होती. 

        जश्ने ए ईद मिलादुन्नबी च्या शोभायात्रेकरीता उपविभागीय पुलिस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनात कारंजा शहर ठाण्याचे निरीक्षक निरिक्षक आधारसिंग सोनोने यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केले होते.  

No comments

Powered by Blogger.