Header Ads

राष्ट्रीय टपाल सप्ताह 2022 चे आयोजन - नागपूर डाक क्षेत्राद्वारे ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान आयोजन Rashtriya Tapal Saptah २०२२ National Postal Week 2022

Rashtriya Tapal Saptah २०२२ National Postal Week 2022 - राष्ट्रीय  टपाल सप्ताह 2022 चे आयोजन - नागपूर डाक क्षेत्राद्वारे ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान आयोजन


राष्ट्रीय  टपाल सप्ताह 2022 चे आयोजन

  • नागपूर डाक क्षेत्राद्वारे 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान आयोजन 
  • आठवडाभर विविध उपक्रमांद्वारे होणार सप्ताह साजरा
  • नागपूर क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे यांचे प्रतिपादन

        नागपूर 8 ऑक्टोबर 2022 - नागपूर  डाक  क्षेत्राद्वारे 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय टपाल  सप्ताह 2022 (Rashtriya Tapal Saptah 2022 / National Postal Week 2022) चे आयोजन करण्यात आले असून यादरम्यान आठवडाभर  विविध उपक्रमांद्वरे हा सप्ताह साजरा करुन विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यात डाकसेवा अधिक लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने नागपुर क्षेत्रीय विभाग कार्यरत असेल, असे प्रतिपादन  नागपूर  क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल (विदर्भ क्षेत्र) शोभा मधाळे (Shobha Madhale) यांनी आज केले. सिविल लाईन्स येथील प्रधान डाक घर येथे राष्ट्रीय डाक  सप्ताहासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी  टपाल  सेवा विभागाचे संचालक महेंद्र गजभिये , वरिष्ठ टपाल अधिक्षक रेखा रिझवी प्रामुख्याने उपस्थित होत्या.

        भारतीय डाक विभागाने नव्या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करून ज्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाची गरज आहे अशा राज्यासोबत समन्वय साधून ड्रोनद्वारे अत्यावश्यक सेवा टपाल खात्याच्या माध्यमातून पोहोचविण्याचा सुद्धा विचार असल्याचं नागपूर  क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल  शोभा मधाळे  यांनी यावेळी  सांगितले.

            1874 मध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियन (Universal Postal Union) ची स्थापना झाल्याच्या वर्धापन दिनानिमित्त,  टपाल  विभाग दरवर्षी राष्ट्रीय  टपाल  सप्ताह साजरा करतो, ज्याची सुरुवात जागतिक टपाल दिवस -9 ऑक्टोबर पासून होतेया वर्षीच्या जागतिक टपाल दिवसाची थीम (Theme of World Postal Day) ‘पोस्ट फॉर द प्लॅनेट’ (Post for the Planet) आहे.  भारतीय टपाल विभागात 1,55,000 पेक्षा जास्त  टपाल कार्यालय असून या कार्यालयाच्या विस्तीर्ण अशा नेटवर्कद्वारे स्पीड पोस्ट, बिझनेस पोस्ट, ई-पोस्ट, आधार अपडेट आणि नावनोंदणी, पोस्ट ऑफिस पासपोर्ट यांसारख्या अतिरिक्त प्रीमियम सेवांसह अनोंदणीकृत मेल, नोंदणीकृत मेल, पत्रे, पार्सल, बचत बँक, पोस्टल लाइफ इन्शुरन्स/ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स या पारंपारिक सेवा प्रदान  केल्या जातात.

        या राष्ट्रीय  टपाल सप्ताहाचा प्रारंभ 9 ऑक्टोबर–रविवार  रोजी जागतिक पोस्ट दिवसाने होणार असून यानिमित्त सर्व पोस्ट ऑफिसमध्ये राष्ट्रीय  टपाल सप्ताह 2022 चे बॅनर प्रदर्शित होईल. 10 ऑक्टोबर रोजी वित्तीय सशक्तिकरण दिवसानिमित्त पोस्ट ऑफिस बचत बँक खाती / इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाती उघडण्यासाठी आणि पोस्टल लाइफ इन्शुरन्स/ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स पॉलिसींच्या खरेदीसाठी मोहिमा आयोजित केल्या जातील. 11 ऑक्टोबर  रोजी टपाल टीकीट संग्रह (फिलाटली) दिवसाप्रसंगी शालेय मुलांसाठी एक छंद म्हणून फिलाटलीबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी विभाग फिलाटेलिक क्विझ स्पर्धा, फिलाटेलिक सेमिनार आणि कार्यशाळा आयोजित  केल्या जातील. गडचिरोली भंडारा सारख्या जिल्ह्यात   चंदूपत्ता,  महुवा, हिरडा यासारख्या लघु वनोपज यावर तसेच बुलढाण्याच्या जगप्रसिद्ध लोणार सरोवर यावर टपाल तिकीट तयार करण्याच्या संचाचे   सुद्धा  अनावरण करण्यात येईल अशी माहिती  शोभा मधाळे  यांनी यांनी यावेळी दिली. ऑक्टोबर रोजी मेल आणि पार्सल दिवस असून यादिनी ग्राहकांसाठी ग्राहक मेळाव्याचे आयोजन विभागीय स्तरावर केले जाईल. या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी 13 ऑक्टोबर  रोजी अंत्योदय दिवस असून याअंतर्गतआधार नोंदणी आणि अद्ययावतीकरण शिबिरे ग्रामीण/दुर्गम भागात आणि शहरी झोपडपट्ट्यांमध्ये आयोजित केली जातील. लोकांना ‘थेट लाभ हस्तांतरण’, सामाजिक सुरक्षा पेन्शन, जन सुरक्षा योजना, सुकन्या समृद्धी खाती यांच्या उपलब्धतेबद्दल जागरूक केले जाईल.

        याप्रसंगी डाक सेवा विभाग संचालक महेंद्र गजभिये यांनी राष्ट्रीय  टपाल  सप्ताह 2022 च्या अनुषंगाने एका सादरीकरणाद्वारे उपस्थितांना माहिती दिली. मागील आर्थिक वर्षात नागपूर विभागातील पोस्टल महसूल उपलब्धी बाबत त्यांनी माहिती देतांना नागपूर क्षेत्राने पोस्टल ऑपरेशन्स अंतर्गत रु. 43.61 कोटीचा महसूल जमा केला असल्याचे सांगितले. तसेच नागपूर विभागातील 301 गावे ग्रामीण पोस्टल जीवन विमा ग्राम अंतर्गत समाविष्ट आहेत आणि 31 ऑगस्ट 2022 रोजी ही गावे संपूर्ण विमा ग्राम म्हणून घोषित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.