Header Ads

चिंतामणि ट्रेवल्स च्या यवतमाळ-मुंबई लक्ज़री बसला नाशिक जवळ भीषण अपघात : १२ जणांचा आगीत होरपडून मृत्यू : yavatmal mumbai Chintamani luxury bus accident today : 12 people died due to burns

yavatmal mumbai Chintamani luxury bus accident today : 12 people died due to burns : चिंतामणि ट्रेवल्स च्या यवतमाळ-मुंबई लक्ज़री बसला नाशिक जवळ भीषण अपघात


चिंतामणि ट्रेवल्स च्या यवतमाळ-मुंबई लक्ज़री बसला नाशिक जवळ भीषण अपघात : १२ जणांचा आगीत होरपडून मृत्यू

मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दिली दुर्घटना स्थळास भेट; अपघातग्रस्तांची केली आस्थेने विचारपूस 

मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर

       वाशिम दि ०८ - आज सकाळी पहाटे पाच वाजेच्या सुमाराला यवतमाळहून मुंबईला जाणाऱ्या चिंतामणि ट्रेवल्स च्या खासगी लक्सरी बस (MH 29 AW 3100) चा (yavatmal mumbai Chintamani luxury bus accident today) नाशिक शहरातील औरंगाबाद रोडवर भीषण अपघात झाला. लक्सरी बस ची डीज़ल घेऊन जात असलेल्या टैंकर शी धडक झाली त्यानंतर बसला आग लागली. या अपघातात १२ जणांचा जळल्यामुळे मृत्यू झाला आहे, तर तीसहून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

        यवतमाळ येथून लक्सरी काल दि ०७ रोजी दुपारी ३.३० वाजता निघाली होती. यामध्ये यवतमाळ येथून ३० जण बसले होते, त्यानंतर मार्गात १८-१९ व्यक्ति अजुन बसले होते. यातील अनेक प्रवाशी हे केबिन मध्ये बसविण्यात आले होते. आज सकाळी ५.०० चे दरम्यान नाशिक शहरातील औरंगाबाद रोडवर हा भीषण अपघात घडला. या अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.  

नाशिकच्या अपघातग्रस्त रुग्णांना मुख्यमंत्र्यांनी दिला धीर आणि विश्वास

       घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने शासकीय रूग्णालयात दाखल प्रत्येक जखमी व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. मुख्यमंत्री म्हणाले की,आज पहाटे घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे.अशा परिस्थितीत अपघातग्रस्त प्रवासी व त्यांचे नातेवाईकांच्या सोबत शासन आहे.जिल्हा रुग्णालय व इतर रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना सर्व वैद्यकीय सेवा तातडीने उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.तसेच या अपघातात मृत पावलेला प्रवाशांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींचा सर्व वैद्यकीय खर्च शासन करणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.अगोदर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दुर्घटना स्थळास भेट दिली.

        राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. 

अपघातग्रस्त रुग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु 

        या बस अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. चार घरी सुखरुप पोहचले असून व्हिजन हॉस्पिटलमध्ये दोन रुग्ण उपचार घेत आहेत.पंचवटीतील सिल्वर हॉस्पिटलमध्ये पाच रुग्ण, सुविधा हॉस्पिटलमध्ये एक, जिल्हा रुग्णालयात एकूण ३१ जखमी प्रवासी उपचार घेत आहेत.    

No comments

Powered by Blogger.