Header Ads

PMNAM : PM National Apprenticeship Mela : प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण मेळावा

PMNAM : PM National Apprenticeship Mela प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण मेळावा

प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण मेळावा 

देशभरात 280 ठिकाणी 10 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजित केला जाणार

        दिल्ली दि ०९ - करिअरच्या संधी आणि व्यावहारिक प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्किल इंडिया मोहिमेचा एक भाग म्हणून, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) 10 ऑक्टोबर 2022 रोजी 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात 280 ठिकाणी प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण  मेळावा (PMNAM : PM National Apprenticeship Mela) आयोजित करत आहे. अनेक स्थानिक उद्योगांना या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, जेणेकरून स्थानिक तरुणांना प्रशिक्षणाद्वारे त्यांचे करिअर घडवण्याची संधी मिळेल. सहभागी कंपन्यांना एकाच व्यासपीठावर संभाव्य प्रशिक्षणार्थींना भेटण्याची आणि तिथल्या तिथेच उमेदवार निवडण्याची संधी मिळेल. भारतातील तरुणांची रोजगारक्षमता वाढवण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी प्रशिक्षणार्थी मेळावे आयोजित केले जातात. कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर, प्रशिक्षण देणारी कंपनी विद्यार्थ्याला कर्मचारी म्हणून नियुक्त करण्याची शक्यता आहे.

        इच्छुक व्यक्ती या मेळ्यात सहभागी होण्यासाठी  मेळाव्याचे जवळचे ठिकाण शोधण्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/  या संकेतस्थळावर नोंदणी करू शकतात. अर्ज करण्यास पात्र ठरण्यासाठी  विद्यार्थ्यांकडे 5वी-12वी इयत्ता उत्तीर्ण प्रमाणपत्र, कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्र, आयटीआय डिप्लोमा किंवा  पदवीधर  असणे आवश्यक आहे. ज्यांनी आधीच नावनोंदणी केली आहे, त्यांना सर्व संबंधित कागदपत्रांसह कार्यक्रमस्थळी पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

        आपल्या मोहिमेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार दरवर्षी दहा लाख तरुणांना कौशल्य प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहे.आस्थापना आणि विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण मेळाव्याचा  (PMNAM)  एक व्यासपीठ म्हणून उपयोग केला जात आहे,तसेच सहभागी कंपन्यांमध्ये अस्तित्वात असलेल्या विविध संधींबद्दल तरुणांमध्ये जागरूकता देखील निर्माण  करत आहे.

No comments

Powered by Blogger.