Header Ads

बाल कामगार आढळल्यास १०९८ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा : Contact 1098 toll free number if found child labour



बाल कामगार आढळल्यास 1098 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

सरकारी कामगार अधिकारी यांचे आवाहन

      वाशिम, दि. 07 www.jantaparishad.com (जिमाका) : राज्यात काही जिल्हयात धनगर/ मेंढपाळाकडे आदिवासी कातकरी समाजाच्या पालकांची लहान मुले बालमजूरी करीत असल्याचे आढळून आले आहे. शेळी-मेंढी पालन, शेतीत विशेषतः उसतोड, विटभट्टी इत्यादी उद्योगात/ कामाच्या ठिकाणी बाल कामगार (child labour) काम करीत असल्याचे आढळल्यास बालकामगार व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम १९८६, सुधारणा २०१६, कलम ३ व ३ (अ) नुसार फौजदारी गुन्हा ठरतो. संबंधीत मालक, मुख्य मालक, कंत्राटदार यांच्याविरुध्द या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात येतो. कलम १४ नुसार संबंधीत मालक, मुख्य मालक, कंत्राटदार दोषी आढळल्यास ६ महिने ते २ वर्ष किंवा २० हजार ते ५० हजार रुपये किंवा दोन्ही शिक्षेची तरतुद आहे.

         जिल्हयातील सर्व आस्थापनाधारकांनी आपल्या आस्थापनेवर बाल कामगार कामावर ठेवू नये. बाल कामगार काम करीत असल्याचे आढळुन असल्यास १०९८ या टोल फ्री क्रमांकावर (Toll free Number 1098) संपर्क साधावा. असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी गौरवकुमार नालिंदे यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.