Header Ads

वाशिम जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर - panchayat samiti sabhapati reservation in washim district declared

वाशिम जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर - panchayat samiti sabhapati reservation in washim district declared


वाशिम जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर

        वाशिम दि.७ www.jantaparishad.com (जिमाका) - जिल्हयातील सर्व सहा पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण (Panchayat Samiti Sabhapati Reservation in Washim District) आज ७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन सभागृह येथे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोडत सभेत निश्चित करण्यात आले.

         आज झालेल्या सोडत सभेत जिल्ह्यातील ६ पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये 

  1. वाशीम पंचायत समिती सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), 
  2. मंगरुळपीर पंचायत समिती सभापती पद अनुसूचित जातीसाठी
  3. मानोरा पंचायत समिती पदाचे आरक्षण सर्वसाधारण (महिला)
  4. मालेगाव पंचायत समिती पदाचे आरक्षण सर्वसाधारण (महिला) 
  5. रिसोड पंचायत समिती सभापतीपद सर्वसाधारण गटासाठी
  6. कारंजा पंचायत समिती सभापतीपद सर्वसाधारण गटासाठी 

आरक्षित ठेवण्यात आले आहे. 

             सोडत सभेला सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नू.पी.एम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे व कार्यालय अधीक्षक राहुल वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे (ZP and NCP District President Chandrakant Thakre) यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

No comments

Powered by Blogger.