Header Ads

जिल्हा परिषद सेस फंड योजना ZP Cess Fund Yojana Scheme

 

ZP Cess Fund Scheme जिल्हा परिषद सेस फंड योजना : पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावे

जिल्हा परिषद सेस फंड योजना 

ZP Cess Fund Yojana Scheme

पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावे

        वाशिम,दि.२१ www.jantaparishad.com (जिमाका) - वाशिम जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने सन २०२१-२२ व २२-२३ मधील ५ टक्के जिल्हा परिषद सेस फंड या योजनेचा (ZP Cess Fund Yojana Scheme) निधी खर्च करण्यात येणार आहे.

    २५ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभेमध्ये झालेल्या चर्चेनुसार पात्र दिव्यांग लाभार्थी (Eligible disabled beneficiaries) हा दोन्ही डोळयांनी अंध असल्यास लाभार्थ्याला इलेक्ट्रीक काठी (electric stick), दोन्ही पायांनी दिव्यांग लाभार्थ्यास इलेक्ट्रीक सायकल (Electric cycle), कानानी ऐकू येत नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यास कानाची मशीन (ear machine) पुरविणे, दिव्यांग गरजुंना लॅट्रीन चेअर (Latrine chair) पुरविणे, व्हील चेअर (Wheel chair) पुरविणे,त्याला उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे म्हणुन पिठगिरणी (flour mill) पुरविणे आदी योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आला.    

          तरी गरजू असलेल्या पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी विहीत नमुन्यात १५ ऑक्टोबरपर्यंत विविध साहित्य व योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज करावा.या योजनेचे अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.असे वाशिम जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी मारोती वाठ (Maroti Vath, District Social Welfare Officer of ZP washim) यांनी कळविले आहे.


No comments

Powered by Blogger.