The final answer key of school scholarship exam 2022 announced : शालान्त शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर

The final answer key of school scholarship exam 2022 announced : शालान्त शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर

शालान्त शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर

The final answer key of school scholarship exam 2022 announced

        मुंबई, दि. 21 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी / 5th class) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती 2022 (इ. ८ वी / 8th class) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतिम उत्तरसूची (final answer key of school scholarship exam 2022) जाहीर करण्यात आल्याची माहिती परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली आहे.

        या परीक्षेसाठीची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची १८ ऑगस्ट, २०२२ रोजी परिषदेच्या www.mscepune.in  व https://www.mscepuppss.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहित मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे.  या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. या अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल.

        तसेच अंतिम उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे आयुक्त श्रीमती दराडे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३ वर्ष - ४४ दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२ Janta Parishad E-43 Y-44 24-11-2022

  साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३     वर्ष - ४४    दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२    Weekly Janta Parishad    Edition : 43      Year : 44     Date...