Header Ads

Dr. Sharad Gadakh new VC of PDKV : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. शरद गडाख

Dr. Sharad Gadakh new VC of PDKV : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. शरद गडाख


डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. शरद गडाख

Dr.  Sharad Gadakh to be new VC of PDKV

        मुंबई, दि. 21 : राहूरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातील संशोधन संचालक डॉ. शरद रामराव गडाख यांची अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. Dr.  Sharad Gadakh new VC of PDKV

        राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी (Governor and Chancellor of the University Bhagat Singh Koshyari) यांनी डॉ. गडाख यांची नियुक्ती जाहीर केली. डॉ. गडाख यांची नियुक्ती पाच वर्षांकरिता किंवा ते वयाची ६५ वर्ष पूर्ण करेपर्यंत, यापैकी जे अगोदर येईल, त्या दिवसापर्यंत करण्यात आली आहे.

        डॉ. गडाख (जन्म २९ नोव्हेंबर १९६१) यांनी राहूरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातून वनस्पती शरीर विज्ञान विषयात पीएच. डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन,  प्रशासन व विस्तार कार्याचा व्यापक अनुभव आहे.

    विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले (Dr. Vilas Bhale) यांचा कार्यकाळ दिनांक ४ सप्टेंबर २०२२ रोजी संपल्यानंतर कुलगुरुपद रिक्त झाले होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे (Sant Gadgebaba Amravati University Chancellor Dr. Dilip Malkhede) यांच्याकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

        कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी महासंचालक प्रो. एस. अय्यप्पन यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती. भारतीय कृषि संशोधन संस्थेचे संचालक डॉ. ए. के. सिंह व कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले (Secretary of Agriculture Department Eknath Dawle) हे समितीचे सदस्य होते.

        समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. गडाख यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

No comments

Powered by Blogger.