जिल्हा व राज्यस्तरीय खेळ स्पर्धेकरीता संलग्नता प्रमाणपत्र २७ सप्टेंबरपर्यंत सादर करा - Submit affiliation certificate for sports competition for district and state level by 27th September

जिल्हा व राज्यस्तरीय खेळ स्पर्धेकरीता संलग्नता प्रमाणपत्र २७ सप्टेंबरपर्यंत सादर करा - Submit affiliation certificate for sports competition for district and state level by 27th September

जिल्हा व राज्यस्तरीय खेळ स्पर्धेकरीता संलग्नता प्रमाणपत्र २७ सप्टेंबरपर्यंत सादर करा

जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन

       वाशिम, दि. 21 www.jantaparishad.com (जिमाका) : जिल्हा क्रीडा अधिकारी वाशिम तसेच विविध खेळ संघटनेच्या वतीने जिल्हा ते विभागीयस्तर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेचे आयोजन हे संघटनेमार्फत तांत्रिक व आर्थिक जबाबदारीने करण्यात येणार आहे. क्रीडा संघटनांनी शासनाच्या निर्णयानुसार अटी, शर्ती व नियमांचे पालन करुन ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. संघटनेकडे महाराष्ट्र राज्य संघटनेनी संलग्नता प्रमाणपत्र तसेच नोंदणी प्रमाणपत्र व स्पर्धा घेण्याबाबतचे प्रमाणपत्र जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे २७ सप्टेंबरपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. ज्या संघटनेस महाराष्ट्र राज्य संघटनेची मान्यता आहे, अशाच संघटनांना स्पर्धा आयोजन करण्याची जवाबदारी देण्यात येणार आहे. या स्पर्धेत घेण्यात येणाऱ्या खेळांची नावे पुढीलप्रमाणे आहे.

         आस्टे डू आखाडा, युनी फाईड, कुडो, स्पिडबॉल, टेंग सुडो, फिल्ड आर्चरी, मान्टेस बॉल क्रिकेट, मिनी गोल्फ, सुपर सेवन क्रिकेट, बेल्ट रेस्लीग, फ्लोअर बॉल. थाय बॉक्सींग, हाफ कीडो बॉक्सींग, रोप स्केपींग, सिलंम बम, वुड बॉल, टेनिस हॉलीबॉल, थांग ता मार्शल आर्ट, कुराश, लगोरी, रस्सीखेच, पॉवर लिफ्टींग, बिच हॉलीबॉल, टार्गेट बॉल टेनिस क्रिकेट, जित कुने दो, फुट साल, कार्फ बॉल, टेबल सॉकर, हुफ कॉन दो, युग मुन दो, वोवी नाम, ड्रॉप रो बॉल, ग्रॅप लिंग, पेनटॅक्यु, लंगडी, जंपरोप, स्पोर्ट डान्स, चॉक बॉल, चॉयकॉन्डो, फुटबॉल टेनिस, बुडो, म्यूजिकल चेअर, व टेनिस बॉल क्रीकेट आदी खेळांचा समावेश आहे.

(Games : Aste du Arena, Uni Fide, Kudo, Speedball, Teng Sudo, Field Archery, Mantes Ball Cricket, Mini Golf, Super Seven Cricket, Belt Wrestleag, Floor Ball. Thai Boxing, Half Kido Boxing, Rope Scaping, Silam Bum, Wood Ball, Tennis Hollyball, Thang Ta Martial Arts, Kurash, Lagori, Rope, Power Lifting, Beach Hollyball, Target Ball Tennis Cricket, Jit Kune Do, Foot Sal, Karf Ball , table soccer, hoof con do, yug mun do, wowi nam, drop row ball, grappling, pentacu, limp, jump rope, sport dance, chalk ball, choykondo, football tennis, budo, musical chair, and tennis ball cricket. is included.)

         या खेळांपैकी ज्या संघटना जिल्हयामध्ये स्थापन झालेल्या नाहीत किंवा ज्यांना महाराष्ट्र राज्य संघटनेने मान्यता प्रमाणपत्र दिलेले नाही, अशा संघटनेच्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार नाही. संघटनेच्या खेळाचे महाराष्ट्र राज्य सघटनेचे संलग्नता प्रमाणपत्र तसेच नोंदणी प्रमाणपत्र व स्पर्धा घेण्याबाबतचे प्रमाणपत्र क्रीडा अधिकारी संतोष फुपाटे यांचेकडे कार्यालयीन वेळेत २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत सादर करावे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी कळविले आहे.

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३ वर्ष - ४४ दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२ Janta Parishad E-43 Y-44 24-11-2022

  साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३     वर्ष - ४४    दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२    Weekly Janta Parishad    Edition : 43      Year : 44     Date...