Header Ads

अश्विन ऑटो सर्विसेस तर्फे रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम Ashwin Auto Services - Blood donation and plantation program


Ashwin Auto Services Blood donation camp

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड 63 व्या स्थापन दिवसानिमित्त अश्विन ऑटो सर्विसेस तर्फे रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम 

31 रक्तदात्यांनी केले रक्तदान 

       कारंजा दि ०२ -  इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड 63 व्या स्थापन दिवसानिमित्त स्थानीक अश्विन ऑटो सर्विसेस तर्फे दि 01 सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 

    शिबिर दरम्यान कारंजा रक्तदान चळवळ चे सदस्यांनी भेटी देऊन रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले, शिबिराला सहकार्य करण्यासाठी सर्व रक्तदात्यांचे, सर्व सामाजिक संघटना, संत गाडगेबाबा रक्तपेढी, बडनेरा टीम चे अश्विन ऑटो सर्विसेस चे संचालक चंद्रेश मेहता यांनी आभार व्यक्त केले. 

    तसेच यावेळी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड 63 व्या स्थापन दिवसानिमित्त अश्विन ऑटो सर्विसेस येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी प्रमुख उपस्थितांचे शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड 63 व्या स्थापन दिवसानिमित्त केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला.          यावेळेस प्रामुख्याने इंडियन ऑइल चे सेल्स मॅनेजर शुभम प्रभे, लुब ऑइल चे सेल्स ऑफिसर जोगेश्वर मोहतो, भारत गॅस चे संचालक शेखरभाऊ बंग,मा नगरसेवक प्रमोद गायकवाड, गो ग्रीन चे सर्व सन्माननीय सदस्य आशिष बंड, नितीन उजवणे, गोपाल कडू, आनंद खेडकर, रवी घाटे, प्रवीण जोशी,सर्वधर्म आपत्कालीन चे प्रमुख श्याम सवई, उमेश माहीतकर जे डी चवरे विद्या मंदिर चे प्राचार्य श्रीनिवास जोशी सर डॉ. सुशील देशपांडे,डॉ सौ.स्नेहाताई देशपांडे, प्रकाशदादा राऊत, अमोलदादा रुईवाले उपस्थित होते. 

No comments

Powered by Blogger.