Header Ads

स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत कारंजा बाजार समितीचा राज्यात तृतीय तर विभागात प्रथम क्रमांक Karanja APMC third in state in Smart Project

 

Karanja APMC Bajar Samiti


कारंजा बाजार समितीचा स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत राज्यात तृतीय तर विभागात प्रथम क्रमांक

        कारंजा दि. 02 www.jantaparishad.com -  जागतिक बँक अर्थसहाय्यीत मानमिय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामिण परिवर्तन (SMART) प्रकल्प राज्यांमधे राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत बाजार समितीत्यांची वार्षीक क्रमावारी प्रसिद्ध करणे हा एक प्रमुख घटक आहे. स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत या क्रमवारीत कारंजा बाजार समितीच्या (Karanja APMC) राज्य स्तरावर 307 बाजार समित्यांमधून तीसरा क्रमांक आलेला असून अमरावती विभागाच्या स्तरावर प्रथम क्रमांक आला आहे.  
        पणन संचालक महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सुचित केल्यानुसार कारंजा बाजार समितीने शेतकरी व बाजार घटक यांचे करीता बाजार आवारात केलेल्या पायाभुत सुविधा, आर्थीक कामकाज, वैधानीक कामकाज व इतर निकष यांचे आधारे शासनास सादर केलेल्या माहितीची सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी तपासणी करून निकषानुसार गुणांकन देवून बाजार समितीची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वाशीम यांचे मार्फत शासनास सादर केलेली होती. त्यानुसार बाजार समित्यांना दिलेल्या गुणांनुसार सन 2021-22 या वर्षाची वार्षीक क्रमवारी पणन संचालक यांचे कार्यालया मार्फत प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामधे कारंजा बाजार समीतीने शेतक-यांसाठी व बाजार घटकांसाठी उभारण्यात आलेल्या विवीध पायाभुत सुविधा, आर्थीक व वैधानिक कामकाज शेतक-यांसाठी राबविण्यात असलेल्या विवीध योजना, उपक्रम यामधे कारंजा बाजार समितीची कामगीरी विचारात घेता कारंजा बाजार समितीला राज्यात 161 गुण प्राप्त झाले आहे. या निमीत्ताने कारंजा बाजार समितीचे माजी सभापती, माजी उपसभापती, माजी संचालक मंडळ, मा. प्रशासक, सचिव व समस्त कर्मचारी वृंद यांचे राज्यभरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

            पुढील वर्षी जाहिर होणा-या वार्षीक क्रमवारी मध्ये कारंजा बाजार समिती द्वारे आणखी वरचे स्थान प्राप्त करण्यासाठी जाणीवपूर्वक अधीक प्रयत्न करण्यात येतील. असे मत बाजार समितीचे सचिव श्री. निलेश भाकरे यांनी व्यक्त केले.

No comments

Powered by Blogger.