Header Ads

Asha Parekh honoured Dadasaheb Phalke Award 2020 - ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना 2020 चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Asha Parekh : Dadasaheb Phalke Award 2020 winner - ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना 2020 चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर


ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना 2020 चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Dadasaheb Phalke Award 2020 announced to Asha Parekh

68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा 30 सप्टेंबर रोजी आयोजित

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुरस्कार समारंभाचे अध्यक्ष पद भूषविणार

        नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2022 -  ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना साल 2020 चा दादा साहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award 2020 announced to Asha Parekh) देण्यात येणार असल्याची घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज केली. नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात हा पुरस्कार प्रदान केला जाईल.  

            हा निर्णय घोषित करताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) म्हणाले “दादासाहेब फाळके निवड समितीने आशा पारेख जी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या आजीवन योगदानासाठी सन्मानित करण्याचा आणि पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे, हे जाहीर करताना मला सन्मान वाटतो.” 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा 30 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित केला जाणार असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवतील,असे  त्यांनी जाहीर केले  . 

            आशा पारेख या ख्यातनाम चित्रपट अभिनेत्री, दिग्दर्शक आणि निर्माती असून कुशल भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आहेत. एक बाल कलाकार म्हणून आपल्या कारकि‍र्दीला सुरुवात केल्यावर त्यांनी दिल देके देखो (Dil Deke Dekho) या चित्रपटातून प्रमुख नायिका म्हणून पदार्पण केले आणि त्यानंतर 95हून अधिक  चित्रपटांमधून भूमिका केल्या. त्यांनी कटी पतंग (Kati Patang), तिसरी मंझील (Tisari Manjil), लव्ह इन टोकियो (Love In Tokiyo), आया सावन झूम के (Aaya Sawan Zhoom Ke), आन मिलो सजना (Aan Milo Sajana), मेरा गाव मेरा देश (Mera Gaon Mera Desh) यासारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे .

        आशा पारेख यांना 1992 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी 1998-2001 या काळात केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळाच्या प्रमुख म्हणून काम केले आहे.         

        आशा पारेख यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय पाच सदस्यांच्या निवड समितीने घेतला आहे अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली .

        52 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराच्या निवड समिती मध्ये चित्रपट क्षेत्रातील खालील  पाच सदस्यांचा समावेश होता:  

1.   आशा भोसले (Asha Bhosale)  2.   हेमा मालिनी (Hema Malini) 3. पूनम ढिल्लो (Poonam Dhillo) 4.   टी. एस. नागभरणा (T.S.NagBharna) 5. उदित नारायण (Udit Narayan)

No comments

Powered by Blogger.