Header Ads

कारंजा तालुक्यातील चार ग्रामपंचायतीमध्ये आचारसंहिता लागू - Karanja taluka grampanchayat election

gram panchayat


कारंजा तालुक्यातील चार ग्रामपंचायतीमध्ये आचारसंहिता लागू

          वाशिम, दि. 17 (जिमाका) : जिल्हयातील कारंजा तालुक्यातील (Karanja Taluka) धनज, वाई, किन्ही (रोकडे) व काजळेश्वर या चार ग्रापंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूक (grampanchayat election) होणार आहे. या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये 12 ऑगस्टपासून आचारसंहिता लागू झाली आहे. 

        ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक माहे जानेवारी 2021 ते मे 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व जून 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूकीसाठी संगणक प्रणालीव्दारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाने घोषित केला आहे. त्या अनुषंगाने प्रत्यक्ष निवडणुक कार्यक्रमाबाबत आदेश प्राप्त झाले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.