Header Ads

वाशिम जिल्ह्यात सामुहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात - samuhik rashtragit gayan in washim district

washim district map


वाशिम जिल्ह्यात सामुहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात

Samuhik Rashtragit Gayan in Washim District

    वाशिम दि.१७ www.jantaparishad.com - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य सप्ताहाअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन , महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम), जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात  आज १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात करण्यात आले.    

collector office washim

जिल्हाधिकारी कार्यालय येथे सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात 

         भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य सप्ताहाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृह येथे आज १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात करण्यात आले.    
             यावेळी अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार,निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी सुनील विंचनकर, नितीन जाधव,जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे,जिल्हा अधिक्षक भुमिअभिलेख शिवाजी भोसले,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दिनेश बारापात्रे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सागर हवालदार, महावितरणचे कार्यकारी अभियंता रत्नदीप तायडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय, पुरवठा विभाग, भूमि अभिलेख विभाग, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्हा खनिकर्म कार्यालय, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय,महिला व बालकल्याण विभाग कार्यालय आणि नगर विकास कार्यालय येथील अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने सहभागी होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहु भगत यांनी मानले.

niyojan bhavan washim


नियोजन भवन येथे सामूहिक राष्ट्रगीत गायन 

             भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य सप्ताहांतर्गत आज १७ ऑगस्ट रोजी नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन कार्यालय,मानव विकास समिती आणि सांखिकी कार्यालय यांच्या संयुक्त वतीने सकाळी ११ वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. 
       यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे,मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्री.नगराळे,श्री. जायभाये,संशोधन सहाय्यक श्री.पानगे, श्री.आव्हाड, सांख्यिकी सहाय्यक श्री.कुमरे, श्री.साळी,श्री.हेंद्रे,श्री.अवचार, श्री.फुके, श्री.हेंद्रे व शिपाई सुनील धानोरकर यांनी सामूहिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रमात सहभाग घेतला.

mahila arthik vikas mahamandal washim

माविम कार्यालयात  समूह राष्ट्रगीत गायन 

             आज १७ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य सप्ताहांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) जिल्हा कार्यालय येथे सकाळी ११ वाजता समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. 
       माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे,सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख, सहाय्यक नियंत्रण अधिकारी कल्पना लोहकपुरे(काळे), कार्यक्रम अधिकारी प्रांजली वासाके यांचेसह कार्यालयातील व लोकसंचालित साधन केंद्रातील कर्मचारी सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

jilha parishad washim program


वाशिम जिल्हा परिषदेत सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात
 

            आज १७ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य सप्ताहाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात सकाळी ११ वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात करण्यात आले.    
             सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोन्द्रे,संजय जोले, जिल्हा जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी,कृषी विकास अधिकारी विकास बंडगर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रमेश शिंदे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखेडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

         सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेतील विविध विभागाचे अधिकारी - कर्मचारी बहुसंख्येने सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार उपशिक्षणाधिकारी श्री.डाबेराव यांनी मानले.
jilha krida adhikari karyalay washim

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे सामुहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात

                 भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज 17 ऑगस्ट रोजी स्वराज्य सप्ताहअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे सकाळी 11 वाजता सामुहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात संपन्न झाले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी संजय पांडे, मिलींद काटोलकर, संजय फुफाटे, पलटन नायक होमगार्ड एल.डी. रामटेके, स्काऊट गाईडच्या जिल्हा समन्वयक प्रिती गोल्हर, राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे, बालाजी शिरसीकर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील कलीम मिर्झा, शुभम कंकाळ तसेच जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील खेळाडू, स्काऊट गाईड व होमगार्ड कार्यालयातील कर्मचारी या समुह राष्ट्रगीत गायनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

No comments

Powered by Blogger.