नियमित अपडेट मिळणेसाठी खालील Follow या बटन वर Click करा

फॉलोअर

Shopping on Amazon

वाशिम जिल्ह्यात १० जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश - Prohibition order till 10 July in washim districtवाशिम जिल्ह्यात १० जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

    वाशिम, दि. २७ (जिमाका) - जिल्ह्यात १० जुलै रोजी बकरी ईद हा सण साजरा करण्यात येणार आहे.जिल्हा जातीयदृष्टया संवेदनशील आहे. नजिकच्या काळात शेजारच्या अकोला,अमरावती व यवतमाळ या जिल्हयात घडलेल्या जातीय घटनेच्या प्रतिक्रीया, जिल्हयात उमटून कायदा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

    सद्यस्थितीत पेट्रोल,डिझेल दरवाढ, एमएसपी कायदा लागू करणे,शेतकरी कर्जमाफी,पीक कर्ज मंजूरी,दुध दरवाढ,वाढती महागाई,विज बिल माफी, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच इतर विविध मागण्यासंदर्भात विरोधी पक्षाच्या तसेच शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलनात्मक कार्यक्रमाचे आयोजन,सद्यस्थितीत केंद्र सरकारने सैन्य भरतीस घोषित केलेल्या अग्निपथ योजनेस होत असलेला विरोध व आंदोलनात्मक कार्यक्रम करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    जातीयदृष्टया आणि सण, उत्सवाच्या दृष्टीने जिल्हा अत्यंत संवेदनशील आहे.जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे सोयीचे व्हावे यासाठी १० जुलैपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहे. 

    हे आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय/निमशासकीय अधिकारी- कर्मचारी किंवा विवाह, अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस व कार्यक्रमास लागू राहणार नाही.


Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

जगदंबा माता आरती - अम्बे तू है जगदम्बे काली : Aarti - Ambe Tu Hai Jagdambe Kali

Ambe Tu Hai Jagdambe Kali Aarti Hindi Lyrics - अम्बे तू है जगदम्बे काली आरती हिंदी में , माता महाकाली जगदंबा

Ambe Tu Hai Jagdambe Kali Mata Aarti Hindi Lyrics Maa Jagdamba Durga Kali Mata Aarti अम्बे तू है जगदम्बे काली आरती माँ काली अम्बे ...